माझे वडील अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, गुन्हा दाखल करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:59 AM2019-08-01T03:59:29+5:302019-08-01T04:00:02+5:30

भुसावळ रोड भागात राहत असलेल्या कुटुंबातील हा १२ वर्षांचा मुलगा.

My dad won't let me study, watch TV, file a crime! | माझे वडील अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, गुन्हा दाखल करा!

माझे वडील अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, गुन्हा दाखल करा!

Next

मोहन सारस्वत/लियाकत सैयद।

जामनेर (जि. जळगाव) : मुलं अभ्यास करीत नाही, अशी पालकांची ओरड असते. मात्र जामनेरमधील एका मुलाने ‘माझे वडील मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, आईलाही मारतात. त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी तक्रार थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी मुलाची विचारपूस करून त्याला नवीन कपडे दिले. त्याच्या पालकांना बोलावून समजावून सांगितले.

भुसावळ रोड भागात राहत असलेल्या कुटुंबातील हा १२ वर्षांचा मुलगा. आई शेतात मजुरी करते व वडील गवंडी म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाऊस सुरूअसताना हा मुलगा हाफ पॅण्ट व बनियनवरच पोलीस ठाण्यात आला. निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याला दुकानात नेले, कपडे घेऊन दिले. मुलगा म्हणाला, मला सॅण्डलसुद्धा पाहिजे. मग त्याला सॅण्डलही घेऊन दिली.
 

Web Title: My dad won't let me study, watch TV, file a crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.