अन् माझा निबंध कॉलेजच्या नोटीस बोर्डावर झळकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 05:45 PM2017-08-02T17:45:50+5:302017-08-02T17:46:48+5:30
वीकेण्ड स्पेशलमध्ये माझी लेखन प्रेरणा या सदरात मृदुला भांडारकर यांनी महाविद्यालयीन जीवनातील घटनेला दिलेला उजाळा
माझी आत्मकथा’ या विषयावर मी ‘बस कंडक्टर’ बनून हटके निबंध लिहिला होता. प्रा. डी. के. कुलकर्णी, प्राचार्य जगदग्नी आदी शिक्षक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. माझ्या बाबांची कौतुकाची थाप पाठीवर पडली. माझा निबंध कॉलेजच्या मेन पोर्चमध्ये नोटीस बोर्डावर झळकला, ती माझी लिखाणाची पहिली सुरुवात होय. लग्न झाल्यानंतर सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे मी फक्त कुटुंब, संसार- जबाबदाºया पार पाडत राहिले. माझी लेखनाची इच्छा दडून गेली. लग्नानंतर २० वर्षांनी माझ्या बाबांनी मला लेखन पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या प्रेरणेने मी पुन्हा पेन हाती घेतला. आज बाबा हयात नाहीत, पण त्यांच्यामुळे मला लेखनाचा आनंद पुन्हा गवसला. मराठी साहित्याचा कल्पवृक्ष मला समजत गेला, उमजत राहिला. त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी दावूनिया बाबा गेला’ या ओळी सार्थ नाहीत का?