आपुले मरण पाहिले म्या डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 09:38 PM2020-10-31T21:38:28+5:302020-10-31T21:40:04+5:30

व्हेंटिलेटरवरून त्याला काढून घेण्यात आले. सोशल मीडियावर त्याचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश व्हायरल होत होते.

My eye saw your death | आपुले मरण पाहिले म्या डोळा

आपुले मरण पाहिले म्या डोळा

Next
ठळक मुद्दे अमळनेरातील प्रसंगसर्वत्र श्रद्धांजली वाहिली जात होतीतिरडी रचली जात होतीमहिन्यानंतर तो मृत्यूच्या दारातून परतला

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : व्हेंटिलेटरवरून त्याला काढून घेण्यात आले. सोशल मीडियावर त्याचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश व्हायरल होत होते. पालिकेत त्याच्या मृत्यूची माहिती देऊन अंत्यसंस्काराची पावतीही फाडली गेली. घरासमोर त्याच्या सरणाची तयारी सुरू होती... अन्‌ दैवी चमत्कार व्हावा त्याप्रमाणे तो जोरजोरात हापकू लागला. पुन्हा दवाखान्यात दाखल केले अन्‌ महिनाभरानंतर तो बरा होऊन घरी परतत आहे. अमळनेरच्या जयवंत ढवळेने जिवंतपणी याच डोळ्यांनी स्वतःचे मरण पाहिले.
छायाचित्रकार जयवंत ढवळे नेहमीप्रमाणे ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठला फिरायला गेला. अचानक डोक्याला मार लागला अन्‌ खाली पडला. काय झाले हे समजण्याच्या आत तो बेशुद्ध पडला. अर्ध्या तासानंतर लोकांची गर्दी जमली. डोक्यातून भळाभळा रक्त वाहत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मेंदूला मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळ्याला पाठवण्यात आले. तेथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. परिस्थिती बघून डॉक्टरांनी तो बरा होऊ शकत नाही, असे सांगितले. प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व रिपोर्ट मुंबई, पुणे येथील डॉक्टरांना दाखवण्यात आले. त्यांनीही केस हाताबाहेर गेली असल्याचे सांगितले. ४ रोजी परत अमळनेर आणण्याची तयारी सुरू झाली. काही वेळात प्राण जातील असे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेने अमळनेर आणण्यात आले. इकडे सर्वांचा हसरा विनोदी परखड मित्र गमावला म्हणून सोशल मीडियावर त्याचे श्रद्धांजली संदेश सुरू झाले. पालिकेत त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात येऊन अंत्यसंस्काराची पावती फाडण्यात आली. घरासमोर तिरडी रचण्यात येत होती. अमळनेर येईपर्यंत जयवंतचा श्वास सुरू होता म्हणून अखेर सरळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले अन्‌ काय आश्चर्य! जसे बेडवर टाकले तसा त्याचा श्वास अधिक गतीने सुरू झाला. ज्याच्या मरणाची चर्चास सुरू होती त्याच्यावर पटकन उपचार करा म्हणून भांडणे सुरू झाली. पैसे नसतील तर आम्ही सारे गोळा करू म्हणून अमळनेरकरांनी पुन्हा त्याला धुळे येथे शस्रक्रियेसाठी रवाना केले. जयवंत अधिकच प्रतिसाद देऊ लागल्याने डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या. अमळनेरमधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मित्रपरिवार यांनी वर्गणी गोळा केली तब्बल साडेतीन लाख रुपये गोळा करून उपचार सुरू झाले आणि महिन्याभरात तो पूर्ण बरा झाल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. १ नोव्हेंबर रोजी जयवंत अमळनेरला त्याच्या घरी येत आहे. शेवटी म्हणतात ना  देव तारी त्याला कोण मारी...?

 

Web Title: My eye saw your death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.