माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून आढळले साडेचार हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 01:01 PM2020-09-28T13:01:10+5:302020-09-28T13:04:26+5:30
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून साडेचार हजार रुग्ण आढळले.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राबविण्यात येणारी ह्यमाझे कुटुंब माझी जवाबदारीह्ण या मोहीमेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात १ लाख ५२ हजार १०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ४ हजार २५२ रूग्णांना विविध आजार असल्याचे समोर आले. सहा रुग्ण सारी या आजाराचे, तर ५६१ संशयितांपैकी ५३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. विशेष म्हणजे २९ रुग्ण कुष्ठरोगाचे निघाले आहेत.
माझे कुटुंब माझी जवाबदारीह्णयोजनेत गावातील ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांपासून नगरसेवक व आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होणे अपेक्षित आहे. घराघरात जाऊन कोणी आजारी आहे कोणी आजारी आहे काय, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे वा अन्य आजाराचे रुग्ण शोधणे, वृद्ध लोकांची माहिती गोळा करणे तसेच ताप व खोकला असल्यास करोना चाचणी व उपचार करून घेणे आदी कामे या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
१४५ पथके
तालुक्यातील ग्रामीण भागात ८१ गावांमध्ये १४५ पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. एका पथकात आशावर्कर, अंगणवाडी सेविका एक शिक्षक व एक आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.
सारीचे सहा रुग्ण
तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत ३५ हजार ५८३ कुटुंबातील १ लाख ५२ हजार १०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५६१ कोरोना संशयित, ३६३ सर्दी ताप खोकला, २५८ हिवताप, ऑक्सिजन प्रमाण कमी असलेले तर सारी या आजाराचे ६ रुग्ण मिळून आले आहेत.
ररक्तदाब, मधुमेह रुग्ण संख्या बाळावतेय
इतर आजाराचे चार हजार २५२ इतके रुग्ण या मोहिमेत मिळून आले आहे. यात दोन हजार २१४ उच्च रक्तदाब, ७८ हृदय रक्तदाब,१३४० मधुमेह, १११ अस्थमा, ३० किडनी विकार, ६१ रुग कँसर,५२ क्षय रोग, तर २९ रुग्ण कृष्ठ रोगाचे मिळून आले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांची संख्या बळावते आहे.
२९ कृष्ठरोगी
सन २००५ मध्ये कृष्ठरोगाचे प्रमाण देशात दर दहा हजारांत एकपेक्षा कमी इतके नोंदविले गेले. त्यामुळे हा प्रश्न आता फार मोठा राहिला नाही, म्हणून सर्व कुष्ठरोग योजना शासनाने बंद केली व कुष्ठरोगाची औषधे सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली. परंतु अजूनही नवीन रुग्ण समाजात आढळून येत आहेत. तालुक्यात २९ रुग्ण मिळून येणे लक्षवेधी आहे.