जळगावात लग्नासाठी आलेल्या बडोदा येथील इसमाचा उष्णाघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:49 PM2018-05-20T23:49:41+5:302018-05-20T23:49:41+5:30

मंदिरावर झोपलेले असताना ओढावला मृत्यू

My fatal death in Baroda, near Jalgaon, is going on | जळगावात लग्नासाठी आलेल्या बडोदा येथील इसमाचा उष्णाघाताने मृत्यू

जळगावात लग्नासाठी आलेल्या बडोदा येथील इसमाचा उष्णाघाताने मृत्यू

Next

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २० - तालुक्यातील टाकरखेडा येथे बडोदा येथून लग्नासाठी आलेल्या नामदेव हरचंद बच्छाव (५५, मूळ रा. गलवाडे, ता. अमळनेर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. उष्माघाताबाबत वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला नाही.
गलवाडे येथील रहिवासी असलेले नामदेव बच्छाव हे सध्या बडोदा (गुजरात) येथे वास्तव्यास आहे. २० मे रोजी टाकरखेडा, ता. जळगाव येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने बच्छाव हे या लग्नासाठी आले होते. दुपारी लग्न लागल्यानंतर बच्छाव हे गावातीलच मंदिरावर झोपले. सर्व लग्न विधी आटोपल्यानंतर गावी जायचे असल्याने नातेवाईकांनी मंदिरावर जाऊन बच्छाव यांना उठविले. मात्र ते काहीच हालचाल करीत नसल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मुलीला शोक अनावर
नामदेव बच्छाव मुलगी, जावई व इतर नातेवाईकांसह या लग्नासाठी आलेले होते. या ठिकाणी सर्व जण लग्नसोहळ््यात असताना दुसरीकडे मंदिरावर झोपलेले असतानाच पित्याचा मृत्यू झाल्याने मुलीला शोक अनावर झाला होता. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली होती. येथे मुलीचा शोक पाहून इतरांनाही गहिवरुन आले.

Web Title: My fatal death in Baroda, near Jalgaon, is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.