माझ्या मना लागो छंद ... नित्य गोविंद गोविंद... इंजिनिअर झाला जळगाव इस्कॉन शाखेचा प्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:59 PM2020-01-12T12:59:43+5:302020-01-12T12:59:54+5:30

चांगला युवक घडविण्यासाठी चैतन्य जीवनदासची धडपड

My favorite hobby ... Nitya Govind Govind | माझ्या मना लागो छंद ... नित्य गोविंद गोविंद... इंजिनिअर झाला जळगाव इस्कॉन शाखेचा प्रमुख

माझ्या मना लागो छंद ... नित्य गोविंद गोविंद... इंजिनिअर झाला जळगाव इस्कॉन शाखेचा प्रमुख

Next

चुडामण बोरसे 
जळगाव : उच्च शिक्षण घेऊनही त्याचा ओढा अध्यात्माकडे होता. याच आवडीतून त्याला सवड मिळाली आणि सवडीतून जणू छंद लागला. आणि ‘माझ्या मना लागो छंद .... नित्य गोविंद गोविंद या संत एकनाथ महाराजांच्या अभंगासारखीच अशीच स्थिती या युवकाची झाली आणि आज तो जळगावच्या इस्कॉन शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता मुखोदगत करीत तो आता प्रवचन देत असतो.
चेतन भागवत वंजारी (रा. मुक्ताईनगर) वय वर्षे २६ असे या युवकाचे नाव. आता इस्कॉनमध्ये दीक्षा घेतल्यानंतर चैतन्य जीवनदास असे त्याचे नामकरण झाले आहे. चेतन याचा परिवारही इस्कॉनशी संबंधित आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेले.. घरची स्थिती जेम- तेम. मग कसे- बसे बारावीपर्यंतचे शिक्षण मुक्ताईनगर येथे झाले. त्यानंतर जळगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. कॉलेजला असताना इस्कॉनच्या संपर्कात तो आला.
जीवनात वेगासोबत असावी दिशा
जीवनात वेग असून उपयोग नाही तर त्याला योग्य दिशा आणि ध्येय असणे तितकेच महत्त्वाचे आहे, अशी जाणीव त्याला झाली. कॉलेजमध्ये अभ्यासासोबत भगवतगीता, भागवत यासह अनेक पवित्र ग्रंथंचे अध्ययन त्याने सुरू केले. यापूर्वीही त्याने भगवद्गीता वाचली होती.
गोविंद हा जनी-वनी...म्हणे एका जनार्दनी
मुंबईत काम करीत असला तरी त्याचा आतला आवाज मात्र अध्यात्माचा होता. मुंबई येथे व्यसनाच्या अधीन झालेली तरुण पिढी पहिली, व्यसनासाठी आई -वडीलांना फसविणारे मुले -मुली पाहिल्या. त्यावेळी आपण विकास तर करत आहोत.पण...या पिढीला एक चांगला मनुष्य म्हणून प्रशिक्षित नाही केले तर .... असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. वाढती गुन्हेगारी, घटस्फोट, व्यसनाधिनता पाहून तो खिन्न झाला. आपण दारू पिलेल्या माकडाचा हातात बंदूक देत आहोत, याने शांती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या समाजाला दिशा देण्यासाठी साधू जीवनाचा स्वीकार करण्याचे त्याने ठरविले आणि याच मागार्साठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
सुशिक्षित आणि एका चांगल्या ठिकाणी काम करणारे लोक भगवद्गीता आणि अध्यात्माकडे वळत आहेत, याची जाणीव तरुणांना व्हावी, असा उद्देशही यामागे होता. इस्कॉनमध्ये तो गेला आणि त्यांचाच झाला. इस्कॉनच्या अनेक पायऱ्या पार करीत हा युवक जळगाव इस्कॉन शाखेचा आज प्रमुख बनला आहे. दर बुधवारी त्याचा सत्संग तो घेत असतो. चांगला समाज घडविण्यासाठी त्याची धडपड वाखणण्यासारखी आहे. आज चेतन याचा संपूर्ण परिवार श्रीकृष्ण यांची भक्तीत रममाण आहे.त्यामुळे ...गोविंद हा जनी- वनी म्हणे एका जनार्दनी...
गीतेत भगवान श्रीकृष्ण यांना नेमके म्हणायचे काय हे कळत नव्हते. पण जोपर्यंत प्रामाणिक वैष्णव भक्त यांची कृपया होत नाही तोपर्यंत भगवद्गीता समजत नाही हे तितकेच खरे. त्यानंतर मुंबई विमानतळावर इलेक्ट्रानिक्स अभियंता म्हणून तो कामाला लागला. तिथे जवळपास तीन वर्षे काम केले. पण तिथे अध्यात्माचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच त्याचा ओढा वाढला आणि तो आज इस्कॉन शाखेचा प्रमुुख बनला आहे.
तरुणांनी भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती करावी , एक सुंदर आनंदी जीवन जगावे तसेच एक व्यसनमुक्त ,सुसंस्कृत आणि गुन्हेगारी मुक्त समाज घडावा अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. इस्कॉनमध्ये असे अनेक तरुण मुले जुळलेलीी आहेत. विशेष म्हणजे ही मुले कॉलेज अध्ययन संपल्यावर मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे.
- चैतन्य जीवनदास (प्रमुख, जळगाव इस्कॉन शाखा)

Web Title: My favorite hobby ... Nitya Govind Govind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव