गट तट विसरून विकास काम करणे हेच माझे ध्येय - आमदार मंगेश चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:10 PM2019-11-01T16:10:38+5:302019-11-01T16:12:23+5:30

सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील वंचित व गरीब घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

My goal is to forget the group shores and work for development - MLA Mangesh Chavan | गट तट विसरून विकास काम करणे हेच माझे ध्येय - आमदार मंगेश चव्हाण

गट तट विसरून विकास काम करणे हेच माझे ध्येय - आमदार मंगेश चव्हाण

googlenewsNext
ठळक मुद्देचाळीसगाव पंचायत समितीच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कारसर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील वंचित व गरीब घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहावे







चाळीसगाव, जि.जळगाव : गट, तट, पक्ष विसरून चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील. तसेच शासन व प्रशासन हे एकाच रथाची दोन चाके असून, त्यांच्या समन्वयातून विकासाचे काम पुढे नेत राहील. चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समितीला सक्षम करून त्या माध्यमातून ग्रामपंचायतींना अधिकाधिक बळ देण्याचे काम करायचे आहे. सिंचन विहिरी, एमआरजीएस, िशक्षण, आरोग्य, बांधकाम, बालविकास व महिला बालकल्याण या विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक काम करायचे आहे. पंचायत समिती सदस्यांना अधिकाधिक अधिकार देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करेल. तसेच सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील वंचित व गरीब घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
ते चाळीसगाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
सत्कार समारंभाची सुरवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
भाजप तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, दिनेश बोरसे, उपसभापती संजय भास्करराव पाटील, पंचायत समिती गटनेते राष्ट्रवादीचे गटनेते अजय भाऊसाहेब पाटील, सुनील पाटील मांदुर्णे, अभियंता संघटनेचे योगेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या सत्कार समारंभ प्रसंगी पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, पं.स.सदस्य पीयूष साळुंखे, सुभाष पैलवान, विष्णू चकोर, जिभाऊ आधार पाटील, भाऊसाहेब पाटील, शिवाजी सोनवणे, भाऊसाहेब केदार, लता बाजीराव दौड, वंदना मोरे, भारती पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन पंकज रणदिवे यांनी केले तर आभार विलास भोई यांनी मानले.
 

Web Title: My goal is to forget the group shores and work for development - MLA Mangesh Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.