‘माझी सुरक्षा, माङो हेल्मेट’ लघुपटातून सुरक्षित जीवनाचा संदेश
By admin | Published: May 9, 2017 06:34 PM2017-05-09T18:34:45+5:302017-05-09T18:34:45+5:30
आरव्हीआरच्या लघुपटाला यु-टय़ूबवर 18 तासांत एक हजारांवर नागरिकांची पसंती
Next
जळगाव,दि.9 - तरुणाईतील जोश, वाहन चालवितांना कुटुंबियांकडून सुरक्षिततेबाबत देण्यात येणा:या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारी दुर्घटना हा सारा घटनाक्रम आरव्हीआर इंटरनॅशनल एंटरटेनमेंटने तयार केलेल्या ‘माझी सुरक्षा माङो हेल्मेट’ या लघुपटाद्वारे दाखविण्यात आला आहे. हेल्मेटद्वारे सुरक्षित जीवनाचा संदेश देणा:या या लघुपटाला अवघ्या 18 तासात एक हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लाईक केले आहे.
काय आहे ‘माझी सुरक्षा माङो हेल्मेट’
जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील बंन्टी नावाचा तरुण हा मित्रासोबत जाण्यासाठी घराबाहेर पडतो. मुलगा हेल्मेट विसरल्याचे पाहून वडिल अंगणात त्याच्याकडे हेल्मेट घेऊन येतात. वडिलांची सूचना धुडकावून लावत बंन्टी तसाच मित्रासोबत दुचाकीवर बाहेर पडतो. जळगावात दुचाकीवर फेरफटका मारत असताना सोबतचे काही मित्र आणि मैत्रिणींना भेटतो. या दरम्यान वाहतूक पोलिसाला गुंगारा देण्याच्या प्रयत्नात त्याचा अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडत असतो. बंन्टीसाठी हेल्मेटची केलेली खरेदी आणि त्यानंतर त्याच्या मित्रांना घरी बोलवून हेल्मेटबाबत वडिलांकडून प्रबोधन करण्यात आले आहे.
या ठिकाणी झाले चित्रिकरण
या लघुपटाचे चित्रिकरण स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक, अग्रवाल चौक, आकाशवाणी चौक, प्रभात कॉलनी चौक तसेच युनिटी ऑटोच्या दुकानाजवळ चित्रिकरण करण्यात आले आहे. यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखा व तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांचे सहकार्य लाभले आहे. लोकार्पणानंतर हा लघुपट यू-टय़ुबवर अपलोड केल्यानंतर अवघ्या 18 तासात 1170 नागरिकांची पसंती मिळाली आहे.
आयएमआर विद्यालयात लोकार्पणाचा कार्यक्रम
लघुपटाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम जळगांव येथील आयएमआर विद्यालयात नुकताच झाला. यावेळी आमदार चंदूलाल पटेल, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, होनाजी चव्हाण, युनिटी ऑटो चे संचालक राजेंद्र वाणी व प्रमोद वाणी उपस्थित होते. या लघुपटाच्या निर्मितीसाठी साजिद पठाण , ऋषिकेश सोनवणे, ईश्वर पाटील , विनय अहिरे, अश्विनी जाधव, पूनम परदेशी, आदित्य सिंग, प्रदीप भोई, रविकुमार परदेशी यांनी पुढाकार घेतला.