माझी वसुंधरा अभियानात पहूरपेठ व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:20+5:302021-06-05T04:13:20+5:30

पहूर, ता. जामनेर / चिनावल, ता. रावेर : माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पहूर पेठ, ता. जामनेर ...

In my Vasundhara Abhiyan, Pahurpeth and | माझी वसुंधरा अभियानात पहूरपेठ व

माझी वसुंधरा अभियानात पहूरपेठ व

Next

पहूर, ता. जामनेर / चिनावल, ता. रावेर : माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पहूर पेठ, ता. जामनेर व चिनावल, ता. रावेर ग्रामपंचायतीचा राज्यस्तरावर शनिवारी गौरव करण्यात येणार आहे.

या ग्रामपंचायतींनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांशी संबंधित घटकांवर काम केले, त्यामुळे हा सन्मान करण्यात येणार आहे. पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता रामेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी सेंद्रीय खत प्रकल्प, बायोगॅस, वृक्षलागवड, परसबाग, जिवामृत, जलसंवर्धन, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, दुचाकी चार्जिंग पाॅईंट याठिकाणी गेल्या

आठवड्यात ऑनलाईन व्हर्च्युअल टुरव्दारे राज्यस्तरीय समितीकडे सादरीकरण केले होते.

चिनावल

ग्रामपंचायत गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चिनावल ग्रामपंचायतीने घनकचरा संकलीत करून कंपोस्ट खत तयार करणे, गावात जागोजागी वृक्षारोपण करण्यात आले. काही जागी बगीचा तयार करून गाव प्लास्टिकमुक्त केले, अशी माहिती सरपंच भावना बोरोले यांनी दिली. यासाठी उपसरपंच परेश महाजन, सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया

ग्रामस्थांच्या एकीच्या बळामुळे कार्य करण्यासाठी बळ मिळाले. भविष्यात शासनाच्या प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन गावाच्या सहकार्याने यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहू.

- नीता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत

प्रतिक्रिया

माझी वसुंधरा मोहिमेत गाव प्रदूषणमुक्त व्हावे, यासाठी सर्व रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच घनकचरा प्रकल्प, ई लर्निंग शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. हे त्याचेच यश आहे.

- भावना बोरोले. सरपच, चिनावल.

दोन फोटो

Web Title: In my Vasundhara Abhiyan, Pahurpeth and

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.