भादली हत्येचे गूढ महिनाभरानंतर कायमच

By Admin | Published: April 20, 2017 01:16 AM2017-04-20T01:16:06+5:302017-04-20T01:16:06+5:30

पोलीस हतबल : ठोस पुराव्यासाठी आता ‘नार्को टेस्ट’

The mystery of the Bhadli assassination is always a month later | भादली हत्येचे गूढ महिनाभरानंतर कायमच

भादली हत्येचे गूढ महिनाभरानंतर कायमच

googlenewsNext

नशिराबाद : भादली बु. येथे भोळे कुटुंबाची अमानुष हत्याकांडाची घटना होवून आज गुरुवारी महिना होत आहे तरी पोलिसांंना खुनाचे रहस्य अद्याप उलगडले नाही.  संशयीत आरोपीही गवसलेले नाही. खुनाचे कोडे उगडत नसल्याने पोलीस हतबल झाले आहेत.
पोलिसांनी चौफेर तपास, नातलगांसह अनेकांची चौकशी करुनही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही, जनतेच्या सहकार्याअभावी खुनाचा तपास लागण्यात अडचण येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
भादली बुद्रुक येथील भोळेवाड्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रदीप सुरेश भोळे, त्यांची पत्नी संगीता यांच्यासह मुलगी दिव्या व मुलगा चेतन यांची तीक्ष्ण हत्याराने अज्ञात हल्लेखोरांनी २० मार्च रोजी अमानुष हत्या केली. भोळे कुटुंबाच वंश नामशेष केला. या घटनेमुळे भादलीसह संपूर्ण जिल्हा हादरला व शोक व्यक्त केला. घटनेनंतर पोलिसांनी तपासचक्रे जलदगतीने फिरवले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस एक करुन तपास केला , मात्र आज महिना होवूनही आरोपी शोधण्यात पोलिसांना आव्हान कायमच आहे.  ५० हजाराचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले मात्र त्यासही प्रतिसाद मिळाला नाही.
घटनेचे रहस्य उलगडण्यासाठी जनतेने समोर यावे, पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी निलोत्पल यांनी केले आहे. आतापर्यंत हत्याकांडाबाबत चौफेर तपास करण्यात आला. मात्र ठोस पुरावा व जनतेच्या सहकार्याअभावी तपासात अडचणी आहे, असेही ते म्हणाले.

भादली हत्याकांड प्रकरणात सर्वांगाने तपास केला आहे. त्यात पुरेशी माहिती मिळाली आहे. ठोस पुराव्यासाठी काही जणांची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा गुन्हा उघडकीस येईल अशी खात्री आहे.
-डॉ.जालिंदर सुपेकर,                      पोलीस अधीक्षक

या गुन्ह्यात काही पुरावे मिळाले आहेत. येत्या तीन ते चार दिवसात यात आणखी प्रगती होवू शकते.
-मोक्षदा पाटील,                             अपर पोलीस अधीक्षक

Web Title: The mystery of the Bhadli assassination is always a month later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.