‘नॅक’ मूल्यांकन न करणाऱ्या प्राचार्यांचा पगार थांबविणार

By admin | Published: January 10, 2017 04:27 AM2017-01-10T04:27:21+5:302017-01-10T04:27:21+5:30

‘नॅक’च्या समितीकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत मूल्यांकन करून घेणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील

The 'nac' will stop the salary of the non-assessees | ‘नॅक’ मूल्यांकन न करणाऱ्या प्राचार्यांचा पगार थांबविणार

‘नॅक’ मूल्यांकन न करणाऱ्या प्राचार्यांचा पगार थांबविणार

Next

जळगाव : ‘नॅक’च्या समितीकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत मूल्यांकन करून घेणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे पगार थाबंविण्याचे आदेश उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने शिक्षण सहसंचालकांकडे आपल्या विभागातील महाविद्यालयांचे ‘नॅक’ समितीकडून मूल्यांकन करुन घेण्याचा सूचना दिल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयाने बंगळूरू येथील ‘नॅक’समितीकडून महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार तीन टप्प्यांत तपासणी केली जाईल. महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, विद्यार्थीभिमूख उपक्रम यावर दर्जा ठरेल.
महाविद्यालयाना शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ५ वर्षांत ‘नॅक’कडून तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र खान्देशातील ५ ते ७ महाविद्यालयांना शासनाची मान्यता घेवून १० वर्षे झाली आहेत. मात्र त्यांनी तपासणी न करता ते अनुदान घेत आहेत. खान्देशातील ७८ महाविद्यालयांनी पहिल्या टप्प्याची तपासणी पूर्ण करून घेतली असून, ५ महाविद्यालयांची पहिल्या टप्प्याची तपासणी बाकी आहे. ८३ महाविद्यालयांचा अहवाल उच्चशिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्याचा सूचना दिल्याची माहिती तुपे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The 'nac' will stop the salary of the non-assessees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.