नाडगाव प्रकरणात ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 09:39 PM2020-01-17T21:39:44+5:302020-01-17T21:39:50+5:30
दोघांना अटक : तणावपूर्ण शांतता
बोदवड : नाडगाव येथे क्रिकेटच्या सामान्यवरून दोन गटात तणाव निर्माण झाल्यानंतर गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन भागात केलेल्या तोडफोड प्रकरणी जवळपास ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी १७ रोजी दोन्ही गटाच्या फियार्दीवरून बोदवड पोलिसात परस्पर विरोधात दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहे. एका गटातर्फे भास्कर पंढरीनाथ पवार रा. बोदवड यांच्या फियार्दीनुसार आरोपी गणेश पवार, शुभम आनंदा वाघ, विक्की गुरचळ, निलेश गुरचळ, सुरेश इंगळे, सावन इंगळे, शिंदे शीख, आकाश बच्छाव, अजय भालेराव, छोटू, अजय गवळी, बिट्टू भाचा, राहुल इंगळे, सतीश, विशाल चव्हाण, शुभम इंगळे, मुकेश तायडे, जितू, नाना म्हस्के, अमोल तायडे, मालिनी बाचव, बंटी अवचारे व इतर दहा ते पंधरा आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. तर दुसऱ्या गटातर्फे सुरेश प्रकाश इंगळे रा. प्रतिभाताई नगर नाडगाव यांच्या फियादीवरून आरोपी दीपेश राणा, निखिल निळे, निखिल निळे चा लहान भाऊ, सदाशिव पंढरी पवार, रामा सारवान, विशाल देवकर, सदा पवारचा भाऊ, जीवन मोरे, मनोज मोरे, संदीप मोरे, विकास गायकवाड, शेंड्या उर्फ किसन, गणेश मोरे, अरुण गायकवाड, किरण मोरे व इतर दहा ते पंधरा आरोपी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेत दादाराव पालवे, प्रकाश तायडे, शिवाजी कोल्हे, किशोर पालवे, राजू तायडे यांच्या घराचे दरवाजांचे नुकसान झाले असून स्टेशनवरील चहाची टपरी, नास्ता सेंटर व एका अंडा सेंटरचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकरी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुनील खरे, उप निरीक्षक भाईदास मालचे आदी घटनास्थळी असून पोलीस बंदोबस्त कायम असून सीआपीएफ पथकही आले आहे.