नाहाटा महाविद्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:16 AM2021-07-27T04:16:28+5:302021-07-27T04:16:28+5:30
भुसावळ: येथील नाहाटा महाविद्यालयात कारगिल विजय विजय दिवस साजरा करण्यात आला. शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पचक्र ...
भुसावळ: येथील नाहाटा महाविद्यालयात कारगिल विजय विजय दिवस साजरा करण्यात आला. शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन एनसीसीतर्फे मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी १८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रवीण धिमन हे उपस्थित होते, प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. डी. गोस्वामी आणि उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, शहीद राकेश शिंदे यांचे मोठे भाऊ सुरेश शिंदे हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी कर्नल प्रवीण धिमन यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कर्नल प्रवीण धिमन यांचे लहान भाऊ हे कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले आहे. त्यांनी सर्व मुलांना कारगिल युद्धामध्ये काय काय घडले व पाकिस्तानने भारतावर कसे आक्रमण केले आणि भारताने हा लढा कसा परतवून लावला याबद्दल पूर्ण माहिती दिली. याप्रसंगी कॅप्टन स्मिता चौधरी, लेफ्टनंट दीपक पाटील उपस्थित होते. शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
शहिदांच्या स्मृतीस उजाळा देत पुष्पचक्र अर्पण करताना.