हे भोळ्या शंकरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:14+5:302021-03-13T04:28:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मन मंदिर मैं वास हैं तेरा...ओम नम:शिवाय़...हे भोळ्या शंकरा...असे सुंदर भजन गाऊन विवेकानंद प्रतिष्ठानच्या ...

This naive Shankara ... | हे भोळ्या शंकरा...

हे भोळ्या शंकरा...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मन मंदिर मैं वास हैं तेरा...ओम नम:शिवाय़...हे भोळ्या शंकरा...असे सुंदर भजन गाऊन विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी विभागात महाशिवरात्री मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त निवासी विभागात शिवभजनांचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी निवासी प्रमुख शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सुनील वाघ व कृष्णा सत्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश कुळकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन विनोद एन पाटील यांची उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्याहस्ते शिव शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दुलारी प्रजापती यांनी मन मंदीर मैं वास हैं तेरा हे भजन गायले. त्यानंतर सुनील वाघ महादेवाची कथा सांगितली. रुपेश पाटील यांनी गीत म्हटले तर संजय कानडे यांनी बंब कैलासी हे गीत गायले. मधुसुदन जोशी यांनी हे भोळ्या शंकरा हे गीत सादर केले. तसेच संजय आंबोदकर यांनी भजन म्हंटले. या संपूर्ण कार्यक्रम महादेव भाविक तल्लीन झालेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी महेश कुळकर्णी यांनी शिव महिमा सांगितली व संत तुलसीदास कृत रुद्राष्टक गायले. अखेर शेवटी सर्व शिक्षकांनी व सेवक बंधुनी ओम नम: शिवाय हे भजन गात नृत्य सादर केले. सर्व वातावरण शिवमय, भक्तीमय झाले होते़ या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णा सत्रे यांनी केले. कार्यक्रमात दीपक पाटील, माधव सोनवणे, विजय पाटील, स्वप्नील पाटील, संतोष वाळसे, संजय वराडे, सागर पाटील, पंकज पाटील, नितीन पाटील, राधेशाम पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: This naive Shankara ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.