शिवाजी नगरात नाले सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:16 AM2021-05-23T04:16:12+5:302021-05-23T04:16:12+5:30
सेवाग्राम एक्स्प्रेस बंदमुळे विदर्भ एक्स्प्रेसला गर्दी जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा अल्प प्रतीसाद असल्याचे सांगत दोन दिवसांपासून सेवाग्राम एक्स्प्रेस ...
सेवाग्राम एक्स्प्रेस बंदमुळे विदर्भ एक्स्प्रेसला गर्दी
जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा अल्प प्रतीसाद असल्याचे सांगत दोन दिवसांपासून सेवाग्राम एक्स्प्रेस बंद केली आहे. यामुळे मुंबई-नागपूर विदर्भ एक्सप्रेसला दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. दररोज १०० ते १२५ तिकिटे वेटिंगला दाखवत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सेवाग्राम एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली कोरोना लस
जळगाव : मनपा प्रशासनातर्फे शनिवारी अतिक्रमण विभागातील कर्मचारी संजय ठाकूर, शेखर ठाकूर, ज्ञानेश्वर कोळी, दीपक कोळी, राजू वाघ, अनिल सोनवणे, नितीन भालेराव, भानुदास ठाकरे, किशोर सोनवणे, कैलास सोनवणे,जितेंद्रसिंग चव्हाण, सतीश ठाकरे या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
वीज कर्मचारी कृती संघटनेचे बैठक उत्साहात
जळगाव : महावितरण कर्मचारी सघंटना कृती समितीची महाराष्ट्रातील केंद्रीय प्रमुख पदाधिकारी आॕनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने वीज कामगार, अभिंयते, अधिकारी व कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दयावा व तात्काळ लसीकरण करावे, मेडिक्लेम पाॕलीसी करीता कामगार सघंटनाना विश्वासात न घेता नेमलेला टिपीए तात्काळ बदलावा इत्यादी मागण्या याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जळगाव विभागातून जे. एन. बाविस्कर, नाना पाटील ,पी. वाय. पाटील, विरेंद्र पाटील, पराग चौधरी, कुंदन भंगाळे,प्रदिप पाटील, रवी ठाकूर ,आर. आर. सावकारे, दत्ता न्हावकर उपस्थित होते.