रावेर तालुक्यातील पाल येथे त्रिवेणी संगमातून नामजप साधना शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 08:37 PM2018-12-21T20:37:30+5:302018-12-21T20:40:14+5:30
पाल येथे त्रिवेणी संगमातून तीन दिवसीय नामजप साधना शिबिरास २३ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.
पाल, ता.रावेर, जि.जळगाव : पाल येथे त्रिवेणी संगमातून तीन दिवसीय नामजप साधना शिबिरास २३ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.
सनातन धर्मात जिथे जिथे नद्यांचे किंवा आध्यात्मिक प्रवाहाचे संगम झाले त्या त्या ठिकाणी तीर्थ निर्माण झाले, तसेच रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्याशी वसलेल्या पाल येथील सद्गुरू परमपूज्य श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात २३ ते २५ डिसेंबरपर्यंत तीन दिवसीय नामजप साधना शिबिर गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समितीतर्फे करण्यात आले आहे.
सदगुरू श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या दहाव्या पुण्यतिथी महोत्सवामुळे या कार्यक्रमाला त्रिवेणी संगमाचे स्वरूप निर्माण झालेले आहे. साधना शिबिर व पुण्यतिथी महोत्सवात पूज्य बापूजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून शेकडो संत महंत, महामंडलेश्वर यांच्यासह ५० हजारांच्या आसपास भाविक येण्याची शक्यता आहे. यासाठी चैतन्य साधक परिवारातर्फे सत्संग मंडप, निवास, भोजन, पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, साधकांच्या सेवेसाठी चैतन्य सेक्युरिटी तसेच युवा संघ अशा प्रकारच्या तयारीला सुरुवात झालेली आहे.