गोंगाटातही साधला जातोय नेम

By admin | Published: March 4, 2017 12:55 PM2017-03-04T12:55:35+5:302017-03-04T12:55:35+5:30

दोन आंतरराष्ट्रीय नेमबाज, ७० ते ८० राष्ट्रीय खेळाडू आणि पाच हजारांच्या वर इतर खेळाडू घडले, ते ही शूटिंग रेंजशिवाय. ही कामगिरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनने करून दाखवली आहे.

The name is also being used in Gogate | गोंगाटातही साधला जातोय नेम

गोंगाटातही साधला जातोय नेम

Next

जळगाव : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवूनही रेंजशिवाय शूटींग

आकाश नेवे, ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ४ -  दोन आंतरराष्ट्रीय नेमबाज, ७० ते ८० राष्ट्रीय खेळाडू आणि पाच हजारांच्या वर इतर खेळाडू घडले, ते ही शूटिंग रेंजशिवाय. ही कामगिरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनने करून दाखवली आहे. या खेळाला जळगावात सुरू होऊन ३० वर्षे झालेली असली तरी अजूनही खेळाडू खुल्या जागेत गोंधळ, गोंगाटातच सराव करतात.
जिल्ह्यातील नेमबाजांचा वनवास आज ३० वर्षांनंतरही कायम आहे. संघटनेच्या स्थापनेला ३० वर्षे झालेली असली तर शासनाने अजून जिल्ह्यात शूटिंग रेंज उपलब्ध करून दिलेली नाही. या बिकट परिस्थितीत संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक दिलीप गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्ग काढत दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच ५०० च्या वर राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.
१९८६-८७ च्या सुमारास जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनची स्थापना केली. राज्यभरात तोपर्यंत मुंबई आणि कोल्हापूर येथेच या खेळाच्या अधिकृत संघटना कार्यरत होत्या. जळगावात स्थापन झालेली ही तिसरीच संघटना. त्या वेळी मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानात खुल्या जागेत नेमबाजीचा सराव केला जात होता. त्यानंतर महापालिकेच्या शाळेत सराव केला जात होता. कालांतराने गणपतीनगरात पायोनियर स्पोर्ट्स क्लबने नेमबाजांना सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली.
नेमबाजीचा सराव हा बंदिस्त जागेत केला जातो. मात्र, जळगावात आजही सराव खुल्या जागेत केला जातो. हा सराव करताना आवाज, गोंगाट होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. मात्र, बंदिस्त जागेअभावी अशी कोणतीही सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिली जात नाही. आपण मारलेले शॉट हे योग्य जागी लागलेले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सध्या इलेक्ट्रॉनिक पुली किंवा अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. त्याचद्वारे खेळाडूचे गुणही मोजले जातात. मात्र, जळगाव जिल्हा संघटनेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा नाही. जिल्हा संघटनेकडे फक्त पूर्वीच्या काळी वापरली जात होती, तशीच पुली आहे.
त्यामुळे खेळाडूंना आपले गुण किती आहेत, हे नेमके कळत नाही. सराव जुन्या पद्धतीच्या साहित्यावर होत असला तरी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धा मात्र अत्याधुनिक साहित्यावरच होतात. त्यामुळे ऐन स्पर्धेत खेळाडूंना याचा फटका बसतो.
रायफल असोसिएशनकडे जागेची वानवा असल्याने आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेच्या सरावासाठी एका साहित्य ठेवायच्या चिंचोळ््या खोलीतच दोन नेमबाज सराव करू शकतील, अशी रेंज सुरू केली आहे. याला पत्र्याचे छप्पर असल्याने पावसात पत्र्याच्या आवाजाने आणि उन्हाळ््यात उष्णतेमुळे ही रेंज वापरण्याच्या योग्य राहत नाही. त्याशिवाय बाजूलाच इतर खेळांचा सराव होत असतो. त्यामुळे नेमबाजाच्या कामगिरीवर आवाजाचा परिणामही होतो. याच खोलीच्या पुढे मोकळ््या जागेत इतर खेळाडू सराव करतात. स्पर्धांमध्ये ५० मीटरवर खेळणारे खेळाडू सराव मात्र दहा मीटरवरच करतात. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. असे असले तरी जिल्ह्यातील नेमबाजांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.

Web Title: The name is also being used in Gogate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.