‘अच्छे दिन’च्या नावावर तीन वर्षात जनतेच्या तोंडाला पुसली पाने
By admin | Published: May 27, 2017 12:39 PM2017-05-27T12:39:04+5:302017-05-27T12:39:04+5:30
काँग्रेसचा आरोप : जिल्हाधिका:यांना निवेदन
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.27 - मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असली तरी या काळात सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहे. पेट्रोल दरवाढ, महागाई, शेतकरी आत्महत्या या बाबत सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप करीत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने दुष्काळ कर म्हणून पेट्रोलवर या पूर्वीच 6 रुपये अधिभार लावला आहे. दुष्काळ संपला तरी तो कायम आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा 3 रुपयांचा व आता पुन्हा 2 रुपये अधिकचा अधिभार लावला आहे. जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी झाले तरी सरकार जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सोबतच मुद्रांक शुल्कात वाढ करून जनतेच्या अडचणीत भर टाकल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ. अजरुन भंगाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.