जळगावातील बंदिस्त नाट्यगृहाला संभाजी महाराजांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:16 PM2018-05-16T17:16:53+5:302018-05-16T17:16:53+5:30
महाबळ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहाला छात्रवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याची तसेच नाट्यगृहाच्या अग्रभागी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सर्वपक्षीय व सर्वस्तरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने बुधवार, १६ रोजी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१६ : महाबळ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहाला छात्रवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याची तसेच नाट्यगृहाच्या अग्रभागी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सर्वपक्षीय व सर्वस्तरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने बुधवार, १६ रोजी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदन देताना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, महापौर ललित कोल्हे, अॅड.रविंद्र पाटील, विनोद देशमुख, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नितीन पाटील, नगरसेवक संदेश भोईटे, मुविकोराज कोल्हे, अॅड.विजय पाटील, दीपक सूर्यवंशी, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व पक्षीयांचा पाठींबा
वातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या मागणीला विविध राजकीय पक्षांच्या आमदार तसेच पदाधिकाºयांनी लेखी पाठींबा दर्शविला आहे.
पालकमंत्र्यांशी चर्चा करणार
शिष्टमंडळाने संभाजी महाराजांचे साहित्यक्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते कवीदेखील होते. त्यामुळे त्यांचे नाव याबंदिस्त नाट्यगृहास देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.