स्वच्छता अभियान नावालाच, बसस्थानक नव्हे कचराकुंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:02+5:302020-12-08T04:14:02+5:30
:: भुसावळ आगार : या ठिकाणीदेखील प्लास्टीकच्या पिशव्यांचा कचरा, बाटल्या व खाद्य पदार्थांचे द्रोण ठिकठिकाणी पडलेले दिसून आले. बस ...
::
भुसावळ आगार :
या ठिकाणीदेखील प्लास्टीकच्या पिशव्यांचा कचरा, बाटल्या व खाद्य पदार्थांचे द्रोण ठिकठिकाणी पडलेले दिसून आले. बस स्थानकात इमारतीच्या एका आडोशाला हा ढीग पडलेला दिसून आला. पाळीव प्राण्यांनी तर कचरा अधिकच पसरविल्यामुळे प्रवाशांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. सध्या महामंडळातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येत असतांना, बस स्थानकातील कचरा पाहून प्रवाशांतर्फे हे बस स्थानक नसून, कचरा कुंड्या असल्याचे बोलले जात आहे.
चाळीसगाव आगार :
एकीकडे स्वच्छता अभियान सुरू असतानांच जिल्ह्यातील जळगाव व भुसावळ या दोन्ही मोठ्या आगारांमध्ये अस्वच्छता दिसून आली असतांना, दुसरीकडे मात्र चाळीसगाव आगारात स्वच्छता अभियाना प्रमाणे स्वच्छता करण्यात आलेली दिसून आली. बस स्थानकाचा आतील आणि बाहेरचा परिसर पुर्णपणे स्वच्छ असलेला दिसून आला. प्रवाशांना कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीही ठेवण्यात आलेली दिसून आली.
इन्फो :
दररोज जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बस स्थानकात हजारो प्रवासी ये-जा करित असतात. त्यामुळे बस स्थानकाचा आतील आणि बाहेरचा परिसरही स्वच्छ असला पाहिजे. जळगाव आगारात मात्र प्रवासी बसतात, त्याच ठिकाणी स्वच्छता होतांना दिसून आले. स्थानकातील इतर कानाकोपऱ्यात मात्र नियमित स्वच्छता होतांना दिसून येत नाही.
तुषार देशमुख, प्रवासी.
::
जळगाव आगारात नियमितपणे सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यात येते. स्थानकात प्रवाशांची वर्दळ जास्त असल्यामुळे कचरा निघण्याचेही प्रमाण मोठे असते. मात्र, आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी आगारात दररोज सर्वत्र स्वच्छता व साफसफाईचे काम सफाई कर्मचाऱ्यांकडून करुन घेतो.
प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार.