बाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:37+5:302021-03-20T04:15:37+5:30
जळगाव : विद्यापीठामध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठामधील मोठ्या प्रमाणामध्ये सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, ...
जळगाव : विद्यापीठामध्ये नुकताच पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला. त्यात विद्यापीठामधील मोठ्या प्रमाणामध्ये सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य, प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, प्र. कुलगुरू उपस्थित होते. त्यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही अधिकारी कार्यालयात येऊन गेले पण त्यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली नाही. म्हणून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ जाहीर करावे की, कुणाला कोरोनाची लागण झाली आहे व ज्यांना लागण झाली पण कळविले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. कुणाल पवार यांनी केली आहे.
काही अधिकारी ठेकेदारांची बिले काढण्यासाठी कार्यालयात येऊन गेले आहेत. परंतु त्यानी कोणालाही कल्पना दिली नाही की त्यांना कोरोना झाला आहे. म्हणून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ जाहीर करावे की कोण-कोण कार्यक्रमाला उपस्थित होते व कोणाला लागण झाली आहे व कोणी- कोणी विद्यापीठला कळवले आहे व ज्यांनी कोणी कळविले नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व इतर कर्मचारी अधिकारी यांचे जीव धोक्यात टाकू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.