मनपाच्या विषय समित्यांसाठी सुचविली जाणार नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:32+5:302021-02-26T04:22:32+5:30

जळगाव : मनपातील विषय समित्या लवकरच गठित करण्यात येणार आहेत. गेल्या महासभेत ११ विषय समित्या बरखास्त करून, नवीन विषय ...

Names to be suggested for the subject committees of the corporation | मनपाच्या विषय समित्यांसाठी सुचविली जाणार नावे

मनपाच्या विषय समित्यांसाठी सुचविली जाणार नावे

Next

जळगाव : मनपातील विषय समित्या लवकरच गठित करण्यात येणार आहेत. गेल्या महासभेत ११ विषय समित्या बरखास्त करून, नवीन विषय समित्या गठित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आता शुक्रवारी होणाऱ्या महासभेत ११ समित्यांच्या सदस्यांची नावे भाजप व शिवसेनेच्या गटनेत्यांकडून सुचविली जाणार आहेत. प्रत्येक समितीमध्ये ७ सदस्य असून, त्यात पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या ५ तर सेनेच्या २ सदस्यांचा समावेश करता येणार आहे.

कोर्ट चौकातील अतिक्रमण काढले

जळगाव - शहरातील जिल्हा न्यायालयाला लागून असलेल्या भिंतीला लागून असलेल्या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. काही नाश्त्याचा दुकानावर तर काही वेंडरवरदेखील मनपाकडून कारवाई करून, काही विक्रेत्यांचा मालदेखील जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Names to be suggested for the subject committees of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.