नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पात अमळनेर तालुक्यातील ३४ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:16 PM2020-02-03T16:16:08+5:302020-02-03T16:17:10+5:30

कृषी विभागातर्फे तालुक्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पात ३४ गावांची निवड करण्यात आली आहे.

In the Nanaji Deshmukh Krishi Sanjeevan Project, a selection of 6 villages in Amalner taluka | नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पात अमळनेर तालुक्यातील ३४ गावांची निवड

नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पात अमळनेर तालुक्यातील ३४ गावांची निवड

Next
ठळक मुद्देहवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणारयेत्या सहा वर्षांत तीन टप्प्यात प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार

अमळनेर, जि.जळगाव : कृषी विभागातर्फे तालुक्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पात ३४ गावांची निवड करण्यात आली आहे. राज्य शासन जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महाराष्ट्रातील शेतीपीक उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येते. त्यातून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे.
हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांची प्रगती साधण्याची संधी उपलब्ध झाल्याचे मानले जात आहे.
सतत नापिकी, दुष्काळ, पीक उत्पादनाची घसरण आदीने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. हवामान बदलाने शेती क्षेत्र प्रभावित झाले आहे. हवामान बदलाची व्यापकता वाढण्याची व शेती, भूगर्भातील पाणीसाठा, जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तज्ज्ञांच्या अहवालातूनही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दुष्काळ, नापिकीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे, उत्पादकता क्षमता वाढवून शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प राज्यातील निवडक जिल्ह्यात निवडक गावात राबविला जात आहे. त्यात तालुक्यातील ३४ गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी दिली.
या गावात येत्या सहा वर्षांत तीन टप्प्यांत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या गावातील गरजानुसार पाणलोट आधारित जलसंधारण, पाणी उपलब्धतेसाठी विहीर, पाणी साठवण्यासाठी शेततळे, खारपण जमिनीचे व्यवस्थापन, जमिनीतील कर्बग्रहण प्रमाण वृद्धीसाठी रोपे व फळबाग लागवड, हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, पाणी कार्यक्षम वापरासाठी ठिबक व तुषार सिंचन, शेतकरी उत्पादक गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, कृषी व हवामानविषयक सल्ला, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी गाव व गाव समूहाचा सूक्ष्म नियोजन आराखडा लोकांच्या सहभागातून केला जाणार आहे. त्यात पाणी ताळेबंद, जमिनीचे आरोग्य, शेती, शेती उत्पादन, उत्पन्न व शेतीपूरक व्यवसाय समस्या, गरजा व संधी याचा आराखड्यात समावेश राहणार आहे.
टप्पानिहाय गावे
पहिला टप्पा-
सडावण बुद्रूक, रडावण, सडावण खुर्द, चाकवे, कन्हेरे, बहादरवाडी, खोकरपाट, फापोरे बुद्रुक बिलखेडे
दुसरा टप्पा-
सोनखेडी, दापोरी बुद्रूक, लोण
तिसरा टप्पा-
डांगर, लोंढवे, निसर्डी, रणाईचे, पिंपळे खुर्द, आटाळे, आर्डी, आनोरा, तरवाडे, शिरसाळे बुद्रूक, शिरसाळे खुर्द, झाडी, वाघोदे, खरदे, चिमनपुरी, खडके, पिंपळे बुद्रूक, अंबासन, ढेकूसीम, ढेकू खुर्द, गलवाडे खुर्द

Web Title: In the Nanaji Deshmukh Krishi Sanjeevan Project, a selection of 6 villages in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.