सायबर हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी नंदुरबार पोलीस ‘सायबर सेल’ टाकतोय कात

By admin | Published: May 14, 2017 06:11 PM2017-05-14T18:11:23+5:302017-05-14T18:11:23+5:30

सायबर हल्ल्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी नंदुरबार पोलीस स्टेशना सायबर सेल विभाग चांगलाच कामाला लागला आह़े

Nandurbar police to crack cyber cell to respond to cyber attacks | सायबर हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी नंदुरबार पोलीस ‘सायबर सेल’ टाकतोय कात

सायबर हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी नंदुरबार पोलीस ‘सायबर सेल’ टाकतोय कात

Next

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 14 - सध्या होत असलेल्या सायबर हल्ल्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी नंदुरबार पोलीस स्टेशना सायबर सेल विभाग चांगलाच कामाला लागला आह़े या विभागाला मुंबई येथील आयजी सायबर कार्यालयाकडून लवकरच अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे ‘अॅन्टी सायबर क्राईम लॅपटॉप’ तसेच अन्य यंत्रसामग्रीही मिळणार आहेत़
डिजिटल इंडियाच्या पाश्र्वभूमीवर ग्राहकांकडून जास्तीत जास्त ऑनलाईन पध्दती तसेच इंटरनेट सेवांचा वापर करण्यात येत आह़े  दुसरीकडे मात्र सायबर हल्ल्यासारखे प्रकार आता समोर येत आह़े भारतासह शंभर देशांना या सायबर हल्ल्यांचा धोका असल्याचे वृत्त असताना या पाश्र्वभूमीवर जिल्ह्याच्या सायबर सुरक्षेचा आढावा ‘लोकमत’तर्फे घेण्यात आला़ या वेळी सायबर हल्ल्यांच्या प्रकारांना उत्तर देण्यासाठी जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनला लवकरच अद्ययावत सामग्री तसेच सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असे लॅपटॉप लवकरच मिळणार असल्याची माहिती नंदुरबार पोलिसांच्या सायबर शाखेकडून देण्यात आली़ सायबर सुरक्षेसाठी राज्य शासनाकडून तब्बल 837 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येत आह़े त्यातून टप्प्या टप्प्यात राज्यातील सर्व सायबर सेल विभागांना अद्ययावत साधन सामग्री पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, या अद्ययावत साधन सामग्रीमध्ये ‘फॉरेन्सीक टूल्स’ या पाच ते सहा प्रकारच्या हार्डवेअरचाही समावेश असणार आह़े याचा उपयोग डाटा विश्लेषणासाठी करण्यात येणार असून याचा तपासयंत्रणेला मोठे पाठबळ मिळणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली़ त्याचप्रमाणे यासह सह अन्य साधन सामग्री इज्राईलवरुनही मागविण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आल़े जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनकडे सध्या परिस्थितीत अद्ययावत साधन सामग्रीचा तुटवडा आह़े त्यामुळे या परिस्थितीत जिल्ह्यात सायबर हल्ल्याची तक्रार आल्यास यासाठी लढण्यासाठी यंत्रणेकडे ठोस पर्यायाची आवश्यकता आह़े
प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा मनोदय
सध्या होत असलेल्या सायबर हल्ल्याचे प्रकार लक्षात घेता जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचा:यांना मुंबई येथील सायबर सेलच्या मुख्य कार्यालयात प्रशिक्षणासाठी पाठविणार असल्याचा मनोदय जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांनी लोकमतकडे व्यक्त केला़
सायबर क्राईमचा आवाका मोठा असल्याने यासाठी सदैव अपडेट राहणे महत्वाचे आह़े त्यामुळे यासाठी येथील कर्मचा:यांना विशेष प्रशिक्षण दिल्याने याचा नक्कीच फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े 

सायबर हल्ले होत असताना नागरिकांनीही दक्षता घेण्याचा सल्ला सायबर सेल पोलीस स्टेशनकडून देण्यात आला आह़े यात, लायसेन्स असलेलेच सॉफ्टवेअर वापरणे, अधिकृत वेबसाईटलाच भेट देणे, नागरिकांनी आपला रेग्युलर बॅकअप डाटा स्टॉअर करणे, अज्ञात व्यक्तीकडून आलेले       ई-मेल न  बघणे आदींचा समावेश आह़े त्याचप्रमाणे ज्या सुरक्षीत व खात्रीलायक वेबसाईटस् आहेत त्यांनाच भेट देवून फसव्या वेबसाईला भेट न देण्याचाही सल्ला या वेळी सायबर पोलीस स्टेशनतर्फे  देण्यात आला आह़े
सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे हे सायबर पोलीस स्टेशनपुढे मोठे आव्हाण ठरत आह़े यासाठी कर्मचा:यांना लवकरच विशेष प्रशिक्षण दिले जाणार आह़े
    -राजेंद्र डहाळे, पोलीस अधीक्षक, नंदुरबार

Web Title: Nandurbar police to crack cyber cell to respond to cyber attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.