नपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:30 PM2020-08-17T22:30:39+5:302020-08-17T22:30:52+5:30
केली जोरदार घोषणाबाजी : विविध प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष
जळगाव : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात काम करणाºया विविध कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ आॅगस्ट रोजी एकदिवसीय संप करण्यात आला. राज्यभरात हा संप पुकारला गेला. यात जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना, व संघर्ष समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
अमळनेर
येथील नगरपालिकेच्या साडेपाचशे कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा संप केल्याने नगरपालिकेचे कामकाज ठप्प होते.
संपात अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल, उपाध्यक्ष किशोर संघेले भारतीय कर्मचारी महासंघ (इंटक) चे सरचिटणीस सोमचंद संदानशीव , अध्यक्ष प्रसाद शर्मा , महेश जोशी , युवराज चव्हाण , बी के कोळी , मदन पाटील, राजेंद्र वानखेडे , इकबाल पठाण यांच्यासह साडे पाचशे कर्मचारी सहभागी झाले होते.
कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिले. यावेळी संजय चौधरी, नितीन खैरनार, कमलेश पाटील, आरोग्य निरीक्षक चव्हाण, सोमचंद संदानशीव हजर होते
चोपडा
भारतीय मजदूर संघ व संघर्ष समिती यांचे मार्फत सर्व चोपडा नगर परिषदेच्या सर्व कर्मचाºयांनी अनेक दिवसापासून रखडलेल्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी १७ रोजएक दिवसीय संप करून पालिकेच्या गेट जवळ ठिय्या आंदोलन केले.अशी माहिती मजदुर युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक घोगरे यांनी कळविले आहे.
चाळीसगाव
येथील नगरपरिषद कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून सरकारला जागे करण्यासाठीच्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी राज्य संघटना सदस्य तथा जिल्हाध्यक्ष दिनेश जाधव, रोजंदारी कर्मचारी कृती समिती सहसचिव प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, महेश शिंदे, कुणाल महाले, राहुल साळुंखे, विलास नेरपगार, संजय राजपूत, वसंत देशमुख, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, नितीन सुर्यवंशी, सुमित सोनवणे, अरुण देशमुख, प्रसाद बाविस्कर, बापू कोळी, नामदेव तुपे, रुपेश देशमुख, पृथ्वीराज ठोके, कैलास नागणे, नाना कोष्टी, प्रेमा गुजराथी, अशोक देशमुख, दिपाली देशमुख, कलावती पवार, संध्या कोष्टी, यशोदा पवार यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते.