काँग्रेसतर्फे नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन
By admin | Published: January 7, 2017 12:58 AM2017-01-07T00:58:17+5:302017-01-07T00:58:17+5:30
नोटाबंदीच्या विरोधात आक्रमक आंदोलन : रास्ता रोको; प्रवेशद्वारावर चढले पदाधिकारी व कार्यकर्ते
जळगाव : नोटाबंदीच्या विरोधात शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. नोटाबंदीने जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांची होत असलेली होरपळ थांबवा, हक्काचा पैसा मिळावा अशा घोषणा देत संतप्त कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलनही केले.
दरम्यान, आंदोलनकत्र्याना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्याने काही पदाधिकारी व कार्यकत्र्यानी प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश करण्याचा प्रय} केला, यावेळी पोलिसांशी जोरदार चकमकही झाली. यावेळी जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्याने काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रचंड घोषणाबाजी
नोटा बंदी विरोधात कॉँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन बस स्थानकाजवळील महात्मा गांधी उद्यानात सर्वप्रथम पदाधिकारी व जिल्हाभरातील कार्यकर्ते एकत्र आले व तेथून मोर्चाला सुरूवात झाली. पक्षाचे निरीक्षक मनोज राठोड, जिल्हाध्यक्ष अॅड. संदिप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. अजरुन भंगाळे, शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, सुलोचना वाघ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात नोटा बंदी विरोधातील निर्णया विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल़े तसेच पूर्व परवानगी न घेता आंदोलन करून रस्त्यावरील वाहतूक अडविली़ या कारणावरून जिल्हापेठ पोलिसात काँग्रेसच्या आजी-माजी 17 पदाधिका:यांसह 300 ते 400 कार्यकत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यात अॅड़संदीप पाटील, डॉ.अजरुन भंगाळे, डॉ़उल्हास पाटील, ललिता पाटील, डी.जी. पाटील, डॉ़राधेशाम चौधरी, शरद महाजन, उदयसिंग पाटील, प्रभाकर सोनवणे, जमील शेख, श्याम तायडे, सुलोचना वाघ, पराग पाटील, अमजद खान पठाण,अरूणा बाविस्कर, अरूणा बाविस्कर, अजबराव पाटील यांच्यासह 300 ते 400 कार्यकत्र्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
काँग्रेसचे शिष्टमंडळ निवेदन देण्यास गेले असता तेथे जिल्हाधिका:यांसह अन्य अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या दालनासमोर डॉ.अजरुन भंगाळे, डॉ.उल्हास पाटील यांनी ठिय्या आंदोलन केले. तर जिल्हाधिका:यांच्या दालनासमोर अॅड. संदिप पाटील, डॉ. राधेश्याम पाटील, उदय पाटील, डी.जी.पाटील आदींनी ठिय्या आंदोलन केले.
मोदींचा पुतळा जाळला
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसलेल्या कार्यकत्र्यानी घोषणाबाजी सुरू केल्यावर पोलीस अधिका:यांनी आत धाव घेतली. ही संधी साधून पक्षाचे पदाधिकारी अॅड.अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील यांनी गाडीत लपवून ठेवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा काढून त्याचे दहन केले.