भादली हत्याकांड प्रकरणात सात जणांची होणार नार्को टेस्ट
By admin | Published: May 9, 2017 01:45 PM2017-05-09T13:45:37+5:302017-05-09T13:45:37+5:30
न्यायालयाची मंजुरी : आज सर्वाना हजर राहण्याचे आदेश
Next
जळगाव, 9 - तालुक्यातील भादली येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येप्रकरणात सात संशयितांची नार्को, पॉलीग्राप व ब्रेन मॅपींग चाचणी घेण्यास सोमवारी न्यायालयाने मंजुरी दिली. दरम्यान, या सातही जणांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादली बु.।। येथे 20 मार्च रोजी प्रदीप सुरेश भोळे त्यांची प}ी संगीता भोळे, मुलगी दिव्या व मुलगा चेतन अशी चौघांची हत्या झाली होती. एकाच कुटुंबातील चौघांची निर्दयीपणे हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता.
दरम्यान, हा घटनेचा पोलिसांनी सर्वागाने तपास केला, मात्र संशयित नजरेच्या टप्प्यात असतानाही या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी नार्को, पॉलीग्राम व ब्रेन मॅपींग चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तपासाधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तीन वेळा न्यायालयाकडे अर्ज केला होता, मात्र दोन वेळा त्यावर कामकाजच झाले नाही. मंगळवारी तिस:या प्रय}ात न्यायालयाने परवानगी दिली.