नाशिकला बंदोबस्तास जाणाऱ्या पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:16 PM2019-10-10T12:16:41+5:302019-10-10T12:17:17+5:30

लासलगावजवळील घटना

Nashik: A policeman going to a settlement collapses in a train and dies | नाशिकला बंदोबस्तास जाणाऱ्या पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू

नाशिकला बंदोबस्तास जाणाऱ्या पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू

Next

जळगाव : नाशिक येथे राष्ट्रपती दौºयाच्या बंदोबस्तासाठी जात असताना महेंद्र सिताराम उमाळे ( ३० रा. चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार) या पोलीस कर्मचाºयाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी लासलगाव रेल्वे स्थानकावर घडली. उमाळे हे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कार्यरत होते.
राष्टÑपती रामनाथ कोविंद बुधवार व गुरुवारी नाशिक दौºयावर आहेत. त्यासाठी नाशिक परिमंडळातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी महेंद्र उमाळे यांनाही पाठविण्यात आले होते. उमाळे बुधवारी जळगाव येथून भुसावळ येथे गेले. तेथून गोदान एक्सप्रेसने जात असताना लासलगाव स्थानकाजवळ तोल गेल्याने उमाळे गाडीतून खाली पडले व डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे ट्रॅकवरील गँगमन यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
उमाळे याच्याकडे असलेल्या आयकार्डवरुन त्यांची ओळख पटली. यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबियांना माहिती दिली. ते २०१४ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते.
जळगावातून निघाल्यावर तीन तासात मृत्यूची बातमी
गोदान एक्स्प्रेसला जळगावला थांबा नसल्याने महेंद्र हे भुसावळ येथे गेले होते. तेथून दहा वाजेच्या सुमारास गाडीत बसले. अवघ्या तीन ते चार तासात त्यांच्या मृत्यूची जळगावात पोहचली. भाऊ व काही मित्र नाशिककडे तातडीने रवाना झाले. माहिती मिळताच उमाळे यांच्या वडीलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मानसिक धक्का बसेल म्हणून वडीलांना मृत्यू नव्हे तर केवळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. ठाणे येथे पोलीस दलात कार्यरत रमाकांत साळुंखे याने मित्र महेंद्रला ११.३० वाजता फोन केला होता. यावेळी रेल्वेत बसला असून नाशिकला बंदोबस्तासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होत. यानंतर दीड वाजेच्या सुमारास रमाकांतला त्यांच्या मृत्यूची बातमीच समजली.
दोन्ही चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले
महेंद्रच्या पश्चात्त आई, सिंधूबाई, वडील, भाऊ राहूल , पत्नी प्रतिभा व दोन मुले असा परिवार आहे. वडील सिताराम उमाळे गोलाणी मार्केटमध्ये घड्याळ रिपेअरींगचे काम करतात. तर लहान भाऊ राहूल हा दुकानावर काम करतो. महेंद्रच्या मृत्यूने अक्षय (४ वर्ष) व आरुष (वय ६ महिने) हे दोन्ही चिमुकल्याच पितृछत्र हरपले आहे. रात्री उशिरा मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह जळगावला हलविण्यात आला.

Web Title: Nashik: A policeman going to a settlement collapses in a train and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव