आसीरगडच्या गूढ कथेने नशिराबादकर भावूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:41 PM2019-11-15T23:41:05+5:302019-11-15T23:41:15+5:30
नशिराबाद : महाराष्ट्रासह भारतात किल्ले, लेणी ,गुफा, मंदिरे, मशिदी, स्तूप यांची संख्या खूप आहे. या प्रत्येक वास्तूंना हजारो वर्षांचा ...
नशिराबाद : महाराष्ट्रासह भारतात किल्ले, लेणी ,गुफा, मंदिरे, मशिदी, स्तूप यांची संख्या खूप आहे. या प्रत्येक वास्तूंना हजारो वर्षांचा इतिहास आहे. काही वास्तूंना इतिहासाचे पुरावे असतात मात्र काहींना पुरावे नसताना ही तार्किक आधारावर तिला इतिहास प्राप्त होतो. त्या बळावर त्या वास्तूंचा नावलौकिक होतो. हा तार्किक आधार म्हणजेच त्या वास्तूचे गूढ असते. गुढ म्हणजे रहस्य. याच्या खोलात न जाता दुर्गप्रेमी किंवा पर्यटकांनी वास्तूंना भेट देऊन इतिहास जिवंत ठेवावा, असे प्रतिपादन अॅड.सुशील अत्रे यांनी नशिराबाद येथे केले. गूढ रहस्य ऐकण्यात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्पात आसीरगढ चे गुढ याविषयावर अॅड.अत्रे बोलत होते.
ऐतिहासिक व पुराणकालीन वास्तूंना पर्यटनप्रेमी ज्यावेळी भेट देतात.डॉ.अत्रे यांनी आपल्या व्याख्यानातून महाभारत, रामायण इतिहासातील अनेक दाखले देत आसीरगढ किल्ल्याचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडला.