नशिराबाद ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे थकीत पगार मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:17 AM2021-01-20T04:17:12+5:302021-01-20T04:17:12+5:30
नशिराबाद : ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा ते सात महिन्यांपासूनचे पगार रखडले असून वारंवार विचारणा करूनही ...
नशिराबाद : ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा ते सात महिन्यांपासूनचे पगार रखडले असून वारंवार विचारणा करूनही उपयोग होत नसल्याच्या तक्रारी आहेत. थकीत पगार मिळत नसल्याने उपजीविका चालवायची तरी कशी असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या समोर आहे. थकित पगार त्वरीत न मिळाल्यास आंदोलन छेडू असा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कोटीचे उत्पन्न असलेल्या नशिराबाद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मात्र कायम आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा तब्बल गेल्या सहा ते सात महिन्यांचे पगार थकीत आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीत देऊ असे आश्वासन ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी दिले होते. मात्र अद्याप पर्यंतही अनेक कर्मचाऱ्यांचे हे पगार थकलेले आहे. थकीत पगार तात्काळ मिळावे याबाबत ग्रामपंचायतीचे प्रशासकांना कर्मचाऱ्यांनी निवेदनही दिले आहे. तात्काळ पगार मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी अन्यथा सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन छेडू असा इशाराही पत्रकात दिला आहे. पत्रकावर पाणीपुरवठा विभागाच्या १५ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.