नशिराबादला महिलांनी कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:29+5:302020-12-22T04:16:29+5:30
निवडणुकीच्या मैदानात आपलाच विजय कसा होईल यासाठी आतापासूनच व्यूहरचना मोर्चेबांधणी व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार तंत्र इच्छुकांनी सुरू केले ...
निवडणुकीच्या मैदानात आपलाच विजय कसा होईल यासाठी आतापासूनच व्यूहरचना मोर्चेबांधणी व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार तंत्र इच्छुकांनी सुरू केले आहे. अनेक वॉर्डांमध्ये असलेल्या विविध समस्यांबाबत मुद्दा निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे. जे सदस्य कधी वार्डात फिरकलेच नाही नागरिकांच्या समस्यांवर उपाय केले नाही अशांना तर आता चांगलीच चपराक बसण्याची शक्यता आहे. आणि काही वॉर्डांमध्ये तर सदस्यांनी समस्यामुक्त वार्ड करण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी मतदार राजा मध्ये चर्चा रंगताना दिसत आहे.
आतापर्यंत याठिकाणी स्वतंत्र पद्धतीने निवडणूक लढवली जाते मात्र यंदा पॅनल पद्धतीचे नियोजन सुरू असल्याचे चर्चेतून सांगण्यात येते. २३ तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळवसाठी धावपळ करताना दिसत आहे.