नशिराबादकरांची निवडणुकीसाठी न्यायालयात धाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:36+5:302021-01-03T04:17:36+5:30
केली आहे. चार जानेवारीला त्याबाबतचा अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे. शासन व निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त उमेदवारांसह ...
केली आहे. चार जानेवारीला त्याबाबतचा अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे.
शासन व निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त उमेदवारांसह नागरिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आणि इच्छुकांनी त्याची मोर्चेबांधणी सुरू केली. त्यातच नशिराबाद नगरपंचायतीची कार्यवाही शासन दरबारी सुरू असल्याने ग्रामपंचायत निवडणूक तीन महिने लांबणीवर टाकावी, अशा आशयाची मागणी नगर विकास विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावेळी
नगरविकास खात्याला आयोगाकडून आपण नगरपंचायतीची घोषणा करा, असे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार २९ डिसेंबर रोजी नगर विकास विभागाने नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची उद्घोषणा केली आणि त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले असल्याचे सांगण्यात येते. मात्र आयोगाने याबाबत कुठलाही निर्णय घोषित न केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. तब्बल ८२ जणांनी आपले नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
याचिका दाखल......
निवडणुकीबाबतचा तिढा तत्काळ निघावा या उद्देशाने येथील इच्छुकांनी उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन शनिवारी याचिका दाखल केली आहे. त्याचा अंतिम निर्णय ४ जानेवारी रोजी लागणे अपेक्षित आहे. दरम्यान, शेख अझरुद्दीन शेख अहमद पिंजारी, भूषण बाबुराव पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यासाठी माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विकास धनगर, गणेश चव्हाण, दीपक खाचणे सहकार्य करीत आहेत.
माघारीसाठी सर्व उमेदवारांची वज्रमूठ?
निवडणूक आयोग व शासन यांच्याकडून अद्याप निवडणुकीबाबत तिढा सुटत नसल्यामुळे अखेर गावातील सर्व इच्छुक उमेदवारांनी सामूहिकरीत्या माघारी घेण्याच्या निर्णयाबाबत आज रविवार रोजी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी सरपंच पंकज महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली. यामध्ये
सर्वच इच्छुक उमेदवारांनी एक मुखाने जर माघारी घेतली तर निवडणुकीचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्व उमेदवारांना सामूहिक माघारीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
चर्चांना ऊत
दिवसागणिक निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. दिवसेंदिवस राजकीय समीकरणे बदलत आहे निवडणूक होणार की नाही, होणार याचा पेच यावर गल्लोगल्ली चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणूक आयोग काय निर्णय घेते, शासनाच्या उदासीन धोरणामुळे बाबत सर्वच उमेदवार आज माघारीचा झेंडा रोवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून चर्चा रंगत आहे. निवडणूक कोणती करा; मात्र गावाच्या सर्व समस्या सोडवा
नगरपंचायत करा की ग्रामपंचायत; मात्र आमची पंचायत करू नका, असे खोचक टोला मारीत चर्चा रंगत आहे.