नशिराबादकरांना पाणी टंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:01+5:302021-04-05T04:15:01+5:30
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थ तोंड देत आहेत. गेल्या वीस ते पंचवीस ...
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थ तोंड देत आहेत. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणी समस्येवर आश्वासने दिली जातात मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वित झालेले नाही. पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेला आहे जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असते.
जल पातळी खालावल्याने हालअपेष्टा
सध्या गावात बेळी वाघूर, मुर्दापूर, नशिराबाद पेठ या ठिकाणाहून पाणी पुरवठा होत आहे त्यातच गेल्या गेल्या काही दिवसांपासून बेळी येथील वाघूर नदीपात्रातील विहिरीतील पातळी खोल गेल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे. आता तब्बल नवव्या दिवशी ग्रामस्थांना पाणी मिळते. दरम्यान मुर्दापूर धरणाजवळील विहिरीची जलपातळी वाढत्या उन्हाचे तीव्रतेने खोल जाण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पाणी टंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे.
१६ कोटींची योजना पाण्यात...
गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा म्हणून सोळा कोटी रुपयांची पाणी योजना मोठा गाजावाजा करीत कार्यान्वित करण्यात आली मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक अडथळ्यांची विघ्न आल्याने शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचितच राहिले काही वर्ष ही योजना मर्जीप्रमाणे हाताळली. आता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी लाखो रुपयांची वीज वापरली जाणार असल्यामुळे या योजनेची बिल ग्रामपंचायतीला परवडणारे नाही. त्यामुळे योजना ग्रामपंचायतीला परवडणारी नाही असे म्हटले जात आहे. नाकापेक्षा मोती जड अशी योजना ग्रामस्थांना ठरली आहे.