३५ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:16 PM2019-09-10T22:16:49+5:302019-09-10T22:17:42+5:30
जळगाव - रोटरी क्लब आॅफ जळगाव स्टार्स क्लबच्यावतीने नुकतेच शिक्षक दिन व जागतिक साक्षरता दिनानिमित्त देऊन सन्मानित करण्यात आले. ...
जळगाव- रोटरी क्लब आॅफ जळगाव स्टार्स क्लबच्यावतीने नुकतेच शिक्षक दिन व जागतिक साक्षरता दिनानिमित्त देऊन सन्मानित करण्यात आले.
गणपती नगरातील डॉ. जी.डी.बेंडाळे कम्युनिटी वेलफेअर सेंटरच्या भैय्यासाहेब नथमल लुंकड सभागृहात हा सन्मान सोहळा झाला़ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केसीईचे क्रीडा संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके व अध्यक्ष सागर मुंदडा, मानद सचिव करण ललवाणी यांची उपस्थिती होती. तसेच प्रा. बेलोरकर, डॉ. फिरके, विराफ पेसुना यांनी उपस्थित शिक्षकांना सर्वप्रथम मार्गदर्शन केले. तर सत्कारार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार सागर मुंदडा यांनी मानले. सूत्रसंचालन कनिष्का मुजुमदार या विद्यार्थिनीने केले. यशस्वीतेसाठी रोटरी स्टार्सच्या लिट्रसी कमेटी चेअरमन याजवीन पेसूना, धनराज कासट, पुनीत रावलानी, सचिन बलदवा, योगेश कलंत्री, दिपीका चौधरी, जिनल जैन, चेतन सोनी, चंदन तोष्णीवाल, सौरभ मुंदडा, अश्विन मंडोरा, विपुल पटेल, योगेश सांखला, आकाश तोतला यांनी परिश्रम घेतले.
‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने यांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात रुस्तमजी शाळेचे विराफ पेसूना, काजल सुखवानी, शिरीन चांंडक, शालिनी मेहता, आशना उजाागरे, वंदना शुक्ला, पूजा दुबे, मिनाक्षी सरोदे, अर्चना मंत्री, जळगाव इंग्लीश मिडीयम स्कूलचे संजय इंगळे, रेखा कोळी, सुनीता बर्डे, ईश्वरलाल येवले, वैभव पाटील, चेतन कापडणे, प्रियंका वानखेडे, मनोहर पाटील, निकेतन पाटील तर कानळदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील भास्कर ठोके, संदीप पाटील, अशोक सैंदाणे, छाया पाटील, निलांबरी पाटील, श्रद्धा पाटील, योगिता शिंदे, संध्या पाटील, बहिणाबाई माध्यमिक विद्यालयाचे डॉ.प्रतिभा राणे, डॉ. विलास नारखेडे, राजेश वाणी, प्रतिभा खडके, तसेच प्रविण पाटील, शरद पाटील, प्रमोद अत्तरदे, सचिन महाजन, रणजित पाटील आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.