श्रीराम पाटील यांचा राष्टÑवादीला ‘राम राम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:23 AM2019-03-27T11:23:54+5:302019-03-27T11:24:37+5:30

घुमजाव: आज उमेदवारीची घोषणा होती अपेक्षित

The nation of Shriram Patil, 'Ram Ram' | श्रीराम पाटील यांचा राष्टÑवादीला ‘राम राम’

श्रीराम पाटील यांचा राष्टÑवादीला ‘राम राम’

Next


जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांनी उमेदवारी जाहीर करण्याच्या अगोदरच रिंगणातून माघार घेत राष्टÑवादी कॉँग्रेसला ‘राम राम’ केला आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक कॉँग्रेसने लढवायची की राष्टÑवादीने याबाबत एकमत झाले नसताना सोमवारी एका नाट्यमय घटनेनंतर माजी खासदार ईश्वरलाल जैन हे कोणताही राजकीय वारसा नसलेले उद्योजक श्रीराम पाटील यांना दुपारी २ वाजेच्या सुमारास जैन हिल्सवरील हेलिपॅडवर घेऊन गेले. त्या ठिकाणी श्रीराम पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांच्याशी परिचय करून देत त्यांना उमेदवारी द्यावी असे सांगितले. निवडणूक लढविण्याची तयारीही श्रीराम पाटील यांनी दाखविल्यानंतर केवळ पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांच्याकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. याबाबत आज घोषणा अपेक्षित होती. उभय नेत्यांनी श्रीराम पाटील यांना कामाला लागा असे संकेत देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
अचानक काढता पाय
दरम्यान, मंगळवारी श्रीराम पाटील यांनी काही भेटी गाठी घेतल्याचे सांगण्यात आले मात्र दुपारनंतर त्यांनी राष्टÑवादीतील पदाधिकाऱ्यांना तसेच वरिष्ठ नेत्यांना आपण निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे कळवून धक्का दिला. ही वार्ता मुंबईपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

पुन्हा शोधाशोध
रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. राज्यस्तरावरील २६-२२ च्या फॉर्मूल्यात कोणताही बदल शक्य नसल्याचे संकेत प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी दिले होते. त्यामुळे वाटेला असलेल्या रावेर लोकसभा मतदार संघासाठी पुन्हा उमेदवार शोधण्याची वेळ या पक्षावर आली आहे. पक्षाकडून उमेदवारीसाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार निळकंठ फालक यांचे नाव चर्चेत आहे. आता यांच्यापैकी कुणाला संधी मिळते की नवीन चेहेरा शोधला जातो याबाबत आता उत्सुकता आहे.
श्रीराम पाटील यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. कोरी पाटी असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अगोदर होकार दिला होता. मात्र आज त्यांनी नकार कळविला आहे. पर्यायांबाबत आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
-ईश्वरलाल जैन, माजी खासदार.

Web Title: The nation of Shriram Patil, 'Ram Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.