राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल अखेर सापडला....!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 06:04 PM2018-02-03T18:04:18+5:302018-02-03T18:04:25+5:30

राष्ट्रीय बालशौर्य पदक विजेता आणि गेल्या नऊ महिन्यापासून बेपत्ता असलेला निलेश रेवाराम भिल्ल हा गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे सापडला आहे

National award winner Nilesh Bhal found | राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल अखेर सापडला....!

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल अखेर सापडला....!

Next

मुक्ताईनगर (जि.जळगाव) - राष्ट्रीय बालशौर्य पदक विजेता आणि गेल्या नऊ महिन्यापासून बेपत्ता असलेला निलेश रेवाराम भिल्ल हा गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे सापडला आहे.  सध्या तो ‘चाईल्ड लाईन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वसतीगृहात आहे. शनिवारी दुपारी या संस्थेने  मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधून निलेशबाबत माहिती दिली.

 कोथळी ता. मुक्ताईनगर येथून  १६ मे २०१७ पासून निलेश बेपत्ता झाला होता. कोथळी येथे मुक्ताईच्या जलाशयात वफुली (ता. जि.   बुलढाणा)  येथील भाविक ओंकार उगले यांचा मुलगा भागवत हा अंघोळीसाठी गेला होता. त्याचवेळी घाटावरील पायºयांवरून पाय घसरून भागवत हा जलाशयात पडला. तो खोल पाण्यात बुडत असताना निलेशने पाण्यात उडी टाकून त्याचे प्राण वाचवले होते.  ३० ऑगस्ट २०१५ रोजी ही घटना  घडली होती. या शौर्याबाबत त्याला २६ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालशौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

बक-या चारल्या नाही व त्या उपाशी राहिल्या म्हणून बाबा  रागावतील या भीतीने निलेश भिल्ल व त्याचा लहान भाऊ गणपत याने १६ मे २०१७ रोजी घर सोडले होते. त्या दिवसापासून या दोघा भावंडांचा शोध सुरु झाला. अल्पवयीन असल्याने पोलिसांनीही दक्षता बाळगत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश  भिल्ल बेपत्ता होणे हे प्रकरण प्रशासनासमोर आव्हान बनले होते. २१ मे २०१७ रोजी पंतप्रधान कार्यालयाकडूनसुद्धा याबाबत माहिती घेण्यात आली होती.

१६ ऑगस्ट २०१६  रोजी गणपत हा कानपूर येथील बाल सुधारगृहात आढळला होता. यामुळे नीलेशही सापडणार अशी  आशा होती.आता नऊ महिन्या नंतर निलेश हा गोरखपूर येथील ‘चाईल्ड लाइन ऑफिस’ येथे आढळला आला आहे. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  माणिक निकम, हवालदार कांतिलाल केदारे व नीलेशचे आई -बाबा खाजगी वाहनाने शनिवारी सायंकाळी गोरखपूरकडे रवाना झाले आहेत.

Web Title: National award winner Nilesh Bhal found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.