भारतीय सिंधू सभेच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेस जळगावात प्रारंभ
By admin | Published: July 8, 2017 01:36 PM2017-07-08T13:36:01+5:302017-07-08T13:36:01+5:30
या सभेत देशभरातील 100 प्रतिनिधी उपस्थित होते
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - भारतीय सिंधू सभेच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेस शनिवार, 8 जुलै रोजी जळगावातील जैन हिल्स येथे प्रारंभ झाला. या सभेत देशभरातील 100 प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष लधाराम नागराणी, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष लक्ष्मणदास चंदिरामानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाहक बाळासाहेब चौधरी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी उपस्थित होते. दोन दिवस ही सभा चालणार आहे.
एकत्र कुटुंब पद्धती नाहीसी होत आहे. त्यामुळे नवीन पिढीला संस्कारक्षम करण्याचे मोठे आव्हान आहे. फाळणीनंतर सिंधी समाज भारतात आला. खूप मेहनतीने या समाजाने प्रगती साधली, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाहक बाळासाहेब चौधरी यांनी केले.