ज्ञानदीप विद्यालयात राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:34+5:302021-09-26T04:18:34+5:30
कार्यक्रमप्रसंगी शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या ...
कार्यक्रमप्रसंगी शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर गुगल मीट वरून लिंक टाकून विद्यार्थी व पालकांनाही कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी करून घेण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य कमलेश देवरे यांनी आपल्या मनोगतातून संतुलित आहाराचे जीवनातील व आरोग्य संदर्भातील महत्त्व समजावून सांगितले. शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी शालेय जीवनात आहार व आरोग्य याचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक भरत पाटील, अनिता चौधरी, जागृतीदेवी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
अनिल पवार यांनी सूत्रसंचालन केले. राहुल बाविस्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमप्रसंगी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला ज्योत्स्ना माळी, विद्यालयातील शिक्षक हेमराज पाटील, संदीप पवार, किशोर पाटील, ऊर्मिला पाटील, सुवर्णा पाटील, उर्वशीबेन सरोदे, रूपेश बेलदार, योगेश बोरसे, रवींद्र पाटील, देवीदास पाटील उपस्थित होते.