गरूड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:50+5:302021-09-25T04:16:50+5:30
या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील रासेयो संचालक प्रा. डॉ. सुधीर पुराणिक हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होते. कार्यक्रमाचे ...
या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील रासेयो संचालक प्रा. डॉ. सुधीर पुराणिक हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर.पाटील हे होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रा. डॉ. सुधीर पुराणिक यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमिता पाटील यांनी, तर अश्विनी घोलप यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय भोळे, प्रा. डॉ. प्रदीप औजेकर पारोळा महाविद्यालय, प्रा. डॉ. महेश आर. पाटील, प्रा. डॉ. आर. डी. गवारे, प्रा. डॉ. वसंत एन. पतंगे, प्रा. डॉ. सुजाता सी. पाटील, तसेच प्रा. अप्पा महाजन, प्रा. प्रमोद सोनवणे, प्रा. दीपक पाटील, प्रा. योगेश चौधरी, प्रा. वर्षा लोखंडे, प्रा. रीना गरुड यांच्यासह महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनेश प्रकाश पाटील व प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी परिश्रम घेतले.