महामार्गाच्या साईडपट्ट्या ठरताहेत मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 07:00 PM2017-08-31T19:00:03+5:302017-08-31T19:10:41+5:30

प्रशासन पाहतेय पावसाळा संपण्याची वाट

national,highway,repairing,needed | महामार्गाच्या साईडपट्ट्या ठरताहेत मृत्यूचा सापळा

महामार्गाच्या साईडपट्ट्या ठरताहेत मृत्यूचा सापळा

Next
ठळक मुद्देअपघाताची भितीतातडीने दुरुस्तीची गरजसमांतर रस्त्यांचे काम कधी होणार?

आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.३१- शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६च्या साईडपट्ट्यांची आधीच दूरवस्था झाली असताना पावसाळ्यामुळे अधिकच भयावह परिस्थिती झाली आहे. सुमारे १२ किमी लांबीच्या या महामार्गाच्या दोन्ही साईडपट्ट्यांवर जागोजागी खड्डे झाल्याने महामार्गावरून वाहन खाली उतरविणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या खराब साईडपट्ट्या जणू मृत्यूचा सापळाच बनल्या आहेत. मात्र या साईडपट्ट्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी पावसाळा संपल्याची वाट प्रशासनाकडून पाहिली जात असल्याने या काळात अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी गेल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. साईडपट्ट्यांची दूरवस्था शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खराब साईडपट्ट्यांमुळे वारंवार अपघात होतात. त्यामुळे समांतर रस्त्यांचा विषय पुढे आला आहे. मात्र तो विषय प्रलंबित असल्याने साईडपट्ट्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. शहरातील सुमारे १२ किमीच्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी पावसामुळे माती वाहून गेल्याने अर्धा ते एक-दीड फूटांपर्यंत खाली गेल्या आहेत. त्यामुळे जर मोठ्या वाहनाने ओव्हरटेक केला तर दुचाकी स्वाराला रस्त्याच्या खाली गाडी उतरविणेही अशक्य होते. रात्रीच्यावेळी हे खड्डे लक्षात न आल्याने वाहन रस्त्याखाली उतरविल्यास अपघात होण्याची भिती आहे. दुरुस्तीच्या नावाखाली दगडांचा ढीग या महामार्गाच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यासाठी मुरूमाचे ढीग आणून टाकण्यात आले आहेत. मात्र त्यात मोठमोठे दगड-गोटेच अधिक असल्याने वाहनचालकांना त्यावरून वाहन चालविणे अवघड होणार आहे. सध्या देखील या ढीगाºयांमधून वाहन चालक वाट काढताना दिसत आहेत. दुरुस्तीसाठी मक्ता मात्र पावसाळा संपण्याची प्रतीक्षा साईडपट्ट्यांच्या दूरवस्थेच्या विषयाला ‘लोकमत’ने वाचा फोडली. जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी तसेच नागरिकांनी त्याचा पाठपुरावा केला. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरल्याने साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी १० जिल्हे मिळून १० कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया होऊन एप्रिल ते डिसेंबर २०१७ या कालावधीसाठी साईडपट्ट्या दुरुस्तीचा मक्ताही देण्यात आला असून मक्तेदाराने कामही सुरू केले होते. शहरातील महामार्गालगतच्या साईडपट्ट्यांची काही ठिकाणी थोडी दुरुस्तीही मक्तेदाराने केली होती. मात्र पावसाळा सुरू झाल्याने हे काम बंद पडले आहे. पावसाळा संपल्यानंतर आधी दुरुस्ती केलेल्या पण पावसामुळे नादुरुस्त झालेल्या साईडपट्ट्यांचीही दुरूस्ती करण्याचे आश्वासन ‘नही’तर्फे महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीत देण्यात आले असल्याची माहिती डॉ.राधेश्याम चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: national,highway,repairing,needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.