जामनेरला राष्ट्रवादीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:16+5:302021-06-25T04:13:16+5:30
२५ एचएसके ०१ जामनेर : पंचायत समितीने सिंचन विहीर वाटपासाठी ग्रामसभेतून आलेल्या पात्र लाभार्थ्यांना डावलून नियमबाह्य पद्धतीने लाभार्थी निवड ...
२५ एचएसके ०१
जामनेर : पंचायत समितीने सिंचन विहीर वाटपासाठी ग्रामसभेतून आलेल्या पात्र लाभार्थ्यांना डावलून नियमबाह्य पद्धतीने लाभार्थी निवड केल्याने याच्या चौकशीच्या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
पंचायत समितीत काही कर्मचारी व अधिकारी गेल्या कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसले असून त्यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने त्यांची बदली करावी. सिंचन विहीर वाटपातील गैरव्यवहारात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याने वितरण पारदर्शकपणे व्हावे तसेच विस्तार अधिकारी प्रशासकपदी असताना त्यांनी फत्तेपूर, गोद्री, जळांद्री येथे १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे धोरण ठरलेले नसताना कोणत्या कामावर खर्च केला याची चौकशी करावी. या मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, विलास राजपूत, प्रदीप लोढा, पप्पू पाटील, डॉ. प्रशांत पाटील, शैलेश पाटील, सागर कुमावत, नटवर चव्हाण, प्रल्हाद बोरसे, दीपक महाराज, विनोद माळी, नरेंद्र जंजाळ यांनी उपोषणात सहभाग घेतला.
जामनेर पंचायत समिती बाहेर उपोषणास बसलेले राष्ट्रवादीचे पदााधिकारी