चक्क नगरपालिका कार्यालयात नैसर्गिक विधी

By Admin | Published: March 22, 2017 12:35 AM2017-03-22T00:35:26+5:302017-03-22T00:35:26+5:30

कारवाई केल्याचा राग : यावलमध्ये हगणदरीमुक्तीचा फज्जा

The natural ritual in the municipal office | चक्क नगरपालिका कार्यालयात नैसर्गिक विधी

चक्क नगरपालिका कार्यालयात नैसर्गिक विधी

googlenewsNext

यावल  : उघड्यावर  नैसर्गिक  विधीस बसल्यामुळे   पालिकेच्या पथकाने   कारवाई केली. दिवसभर   कारवाईस सामोरे जात  न्यायालयाने २०० रुपयांचा दंड आकारल्याचा राग आल्याने शहरातील रामा केशव ढाके या ५५ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी दुपारी चक्क पालिकेच्या कार्यालयात जाऊन शौचविधी उरकला.
पालिका  कर्मचाºयांनी त्यास पोलीस ठाण्यात आणले असता पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर राहण्याबाबत  समन्स बजावला आहे.
 पालिका  पथकाने सोमवारी पहाटे उघड्यावर शौचास बसणाºया ४२ जणांवर कारवाई केली. न्यायालयाने प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावला. याचा रामा केशव ढाके यांना राग आला. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी पालिका कार्यालयात जात कार्यालयाच्या प्रवेशदाराजवळ शौचास बसून शौचविधी उरकला व माझ्याकडे शौचालय नाही. बाहेर गेले तर पालिकेचे कर्मचारी पकडतात. आता येथे पालिकेतच बसल्याने कर्मचारी कसे पकडतील, असे त्याने पालिकेच्या वेल्डिंग काम करणाºया कामगारास एक दिवस आधीच सांगितले होते. त्यानुसार, त्याने मंगळवारी अंमलबजावणीही केली.
  दुपारी    कर्मचाºयांची जेवणाची सुटी असते. काही कर्मचारी   शहरात वसुलीसाठी फिरत होते.
पालिकेने केलेल्या कारवाईचा ढाके यास प्रचंड राग आला होता. यावर त्याने सोमवारी कारवाईत समावेश असलेल्या काही कर्मचाºयांना  सांगितले होते की, मी उद्या पालिकेत जाऊन शौचास बसेल. त्यानुसार त्याने हे कृत्य केले, असे म्हटले जात आहे. पालिकेचे स्वच्छता अधिकारी रमाकांत मोरे यांनी याबाबात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: The natural ritual in the municipal office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.