निसर्ग, प्रेम, वास्तव या विषयांपासून तर ‘सैराट’र्पयत आहे ‘स्वप्नपिसारा’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:41 AM2017-11-24T00:41:12+5:302017-11-24T00:41:28+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात कवी सतीश विनायकराव पवार यांच्या ‘स्वप्नपिसारा’ या कवितासंग्रहाचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय.

From nature, love, reality, to 'Saraat', 'Swapnapisara' is there | निसर्ग, प्रेम, वास्तव या विषयांपासून तर ‘सैराट’र्पयत आहे ‘स्वप्नपिसारा’मध्ये

निसर्ग, प्रेम, वास्तव या विषयांपासून तर ‘सैराट’र्पयत आहे ‘स्वप्नपिसारा’मध्ये

Next

सेवानिवृत्त, उपक्रमशील मुख्याध्यापक असलेले सतीश विनायकराव पवार यांचा ‘स्वप्नपिसारा’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. संवेदनशील, रसिकवृत्ती असणा:या या कवीकडे व्यासंगाबरोबरच सूक्ष्म निरीक्षणशक्ती असल्याचा प्रत्यय या काव्यसंग्रहातील कविता वाचताना वाचकांना सहजपणे येतो. एकूण 56 कविता या काव्यसंग्रहात आहेत. वैचारिक, सामाजिक, कौटुंबिक, निसर्ग, प्रेम, वास्तव, शेतकरी, भ्रष्टाचार, मुलींचा जन्म या विषयांपासून तर आताच्या सैराट चित्रपटातील दिग्दर्शक, नायक-नायिका यांच्यार्पयतचे विषय कवीने हाताळले आहेत. काव्यसंग्रहातील शैलीबाबत आलेले अनुभव वाचकांना अंतमरुख करताना दिसतात. यात कवीच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडते. समाजातील अपप्रवृत्ती पाहून कवी व्यथित होतो, तर नैसर्गिक सौंदर्यातही रममाण होताना दिसतो. समाजातील सभोवतालच्या घटनांचे सूक्ष्म अवलोकन निरीक्षणशक्तीच्या सहाय्याने जुन्या आणि नव्यांचा समन्वय साधताना दिसतो. कवीच्या अनेकविध स्वप्नांचा हा काव्यरूपी पिसारा मनोहारी असला तरी वाचकांना अंतमरुख करणाराही आहे. कवी : सतीश विनायकराव पवार, प्रकाशक : पुष्पा प्रकाशन, पृष्ठे : 64, मूल्य : 80 रुपये

Web Title: From nature, love, reality, to 'Saraat', 'Swapnapisara' is there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.