गँगमन खांब रुळात टाकून पळाल्याने नवजीवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

By admin | Published: May 7, 2017 04:03 PM2017-05-07T16:03:59+5:302017-05-07T16:03:59+5:30

नवजीवन एक्स्प्रेस चे इंजिन खराब झाल्याची घटना सव्वा दहा वाजता पाडसें स्टेशन पासून काही अंतरावर घडली.

The Navgevan Express's engine failed due to the collapse of the Ganganiman rock | गँगमन खांब रुळात टाकून पळाल्याने नवजीवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

गँगमन खांब रुळात टाकून पळाल्याने नवजीवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Next

 अमळनेर, दि.7- अचानक रेल्वे आल्याचे पाहून दुहेरीकरणाचे काम करणा:या गँगमनने लोखंडी खांब रेल्वे रुळाच्या मधेच सोडून पळाल्याने अहमदाबाद कडे जाणा:या नवजीवन एक्स्प्रेस चे इंजिन खराब झाल्याची घटना सव्वा दहा वाजता पाडसें स्टेशन पासून काही अंतरावर घडली. सुदैवाने जीवित हानी टळली

     अमळनेरवरून 10 वाजून 2 मिनिटांनी सुटलेली नवजीवन एक्स्प्रेस पाडसें स्टेशन ओलांडून 5 किमी अंतरावर वळण घेत होती. या दरम्यान ठेकदाराचे खाजगी गँगमन लोखंडी खांब रेल्वे रूळ ओलांडून नेत होते. त्यांना अचानक रेल्वे येताना दिसताच ते लोखंडी खांब तसाच सोडून ते पळाले. या दरम्यान नवजीवन  चे इंजिन क्रमांक 22792 तेथे पोहचले इंजिनाची बॅटरी खाली लोखंडी खांबाला लागून इंजिन मध्ये बिघाड झाला. चालक शेख अब्दुल शेख रहेमान व गार्ड दिलीप संदनशिव यांनी सतर्कता बाळगून गाडी नियंत्रित केली. सुदैवाने या अपघातानंतर कोणतीही जिवित हाणी झाली नाही. 
घटनेचे वृत्त कळताच वाहतूक निरीक्षक एम. सी. शर्मा, जी आर पी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार मुजीब शेख, आर पी एफ चे सहाय्यक फौजदार यादव आणि हवालदार देवरे तसेच इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गाडी मागे घेऊन बाजूच्या रुळावर उभी केलेली मालगाडीचे इंजिन काढून नवजीवन एक्सप्रेसला लावण्यात आले. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी नवजीवन रवाना झाली.
  

Web Title: The Navgevan Express's engine failed due to the collapse of the Ganganiman rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.