नवरात्रोत्सव : दुर्गाष्टमीच्या होमहवन, फुलोऱ्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:02 PM2019-10-05T12:02:02+5:302019-10-05T12:02:51+5:30
कोहळ््याची कमतरता
जळगाव : नवरात्रोत्सावात दुर्गाष्टमीच्या फुलोरा, होमहवनची शहरातील भवानी माता मंदिरासह घरोघरी जोरदार तयारी सुरू असून बाजारपेठेतही पूजा साहित्यासाठी गर्दी होत आहे. बलीसाठी लागणाºया कोहळ््याची (भोरकोहळा) यंदा जादा पावसामुळे आवक कमी झाली असून शुक्रवारी सकाळी बाजार समितीमध्ये अनेक विके्रत्यांना कोहळा मिळाला नाही.
नवरात्रोत्सवात द्वितीया, पंचमी, सप्तमी, अष्टमीला घरोघरी ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेनुसार होमहवन करण्याची प्रथा आहे. त्यात दुर्गाष्टमीला बहुतांश देवीच्या मंदिरासह अनेकांच्या घरीदेखील होमहवन करण्यासह फुलोरा बांधला जातो. तसेच कोहळा फळाला छेद देऊन बली म्हणून तो अर्पण केला जातो.
त्यानुसार यंदाही दुर्गाष्टमीसाठी भवानी माता मंदिरासह ठिकठिकाणी व घरोघरी फुलोरा, होमहवनची तयारी करण्यात येत आहे. ऐश्वर्य व सौख्य वर्धनासाठी नवरात्रोत्सवात देवीच्या डोक्यावर पापड्यांचा फुलोरा बांधला जातो. प्रत्येक जण सव्वा पावशेर ते सव्वा किलोदरम्यान विविष्ट वजनाच्या पापड्यांचा फुलोरा बांधण्याची परंपरा आहे. त्यानुसार बाजारपेठेत वेगवेगळ््या आकार व प्रकारातील फुलोरे विक्रीसाठी आले आहेत.
राक्षसाचा वध म्हणून कोहळ््याचा वापर
नवरात्रोत्सवात बळी दानाला महत्त्व असल्याने सप्तमी, दुर्गाष्टमीला राक्षस समजून बळी देण्यासाठी कोहळा फळाचा वापर केला जातो. यामध्ये कोहळ््याचा शस्त्राने छेद करून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल टाकून तो चौकात ठेवला जातो. तर अनेक जण कोहळ््याचा छेद न करता तो तसाच अर्पण केला जातो.
कोहळ््याची आवक कमी
यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे कोहळ््याच्या आवकवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक विक्रेत्यांना तो मिळाला नाही. यंदा १०१ रुपये ते १५१ रुपये प्रती नग या प्रमाणे या कोहळ््याची विक्री होत आहे.
या सोबतच होमहवनचे साहित्य, पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. सुटे साहित्यासह तयार हवन पुडीदेखील मिळत आहे.