फैजपूर येथे एनसीसीचे १० दिवसीय शिबिर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 06:26 PM2019-06-05T18:26:10+5:302019-06-05T18:27:58+5:30

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने १० दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर दिनांक ४ जून ते १३ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

NCC starts its 10-day camp at Fazpur | फैजपूर येथे एनसीसीचे १० दिवसीय शिबिर सुरू

फैजपूर येथे एनसीसीचे १० दिवसीय शिबिर सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय छात्र सेनेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळते- प्रा.डॉ.अनिल भंगाळे४ ते १३ जून दरम्यान शिबिरात होणार विविध उपक्रमजिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयातील ४०० कॅडेट्सचा सहभाग

फैजपूर, जि.जळगाव : आयुष्यात यशाला गवसणी घालण्यासाठी शिस्त अतिशय महत्वाची असते आणि शिस्त आणि श्रम प्रतिष्ठा एनसीसीमुळे लाभते, असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे यांनी केले.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने १० दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर दिनांक ४ जून ते १३ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा उद्घाटन सोहळा उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.आय भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी १८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी तसेच कॅम्प कमांडंट कर्नल सत्यशील बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, डॉ.उमेश चौधरी, सुभेदार मेजर अनिलकुमार तसेच जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील ४०० कॅडेट्स उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक कर्नल बाबर यांनी केले. त्यांनी शिबिरासाठी महाविद्यालय प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यासोबत पुढील दहा दिवसाच्या प्रशिक्षणाचा सदुपयोग करून आयुष्यात मोठी उंची गाठण्यासाठी प्रेरित केले.
कर्नल बाबर यांनी कडेट्स यांनी काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.उमेश चौधरी यांनी प्रशिक्षणादरम्यान उन्हापासून स्वत:चा बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरात ओबीस्टिकल कोर्स सोबतच फायरिंग, बॅटल फिल्ड बॅटल क्राफ्ट, जगिंग डिस्टन्स, मॅप रिडींग आणि मिलिटरी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शिबिरासाठी नाहटा महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी प्रा.लेफ्टनंट दीपक पाटील, मुक्ताईनगर येथील प्रा.लेफ्टनंट व्ही.एम.लोंढे, बेंडाळे महाविद्यालयातील प्रा.लेफ्टनंट नंदा बेंडाळे, भुसावळ येथील फर्स्ट आॅफिसर आर.बी.इंगळे, खिरोदा येथील चिफ आॅफिसर व्ही.एल.विचवे आदी अधिकारी कडेट्सना विविध विषयांचे प्रशिक्षण देणार आहेत.
शिबिर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर चौधरी, सर्व उपप्राचार्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: NCC starts its 10-day camp at Fazpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.