‘राष्ट्रवादी’ने उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:42 PM2020-07-24T12:42:52+5:302020-07-24T12:43:00+5:30

जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध ...

The NCP has tarnished the image of the Vice President | ‘राष्ट्रवादी’ने उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला फासले काळे

‘राष्ट्रवादी’ने उपराष्ट्रपतींच्या प्रतिमेला फासले काळे

Next

जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला.
दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले.
राष्टÑवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील प्रकाश नेमाडे, अ‍ॅड. कुणाल बन्सीलाल पवार, डॉ.रिजवान इसा खाटीक, कौसर शेख हारुण काकर, किरण कडू वाघ, अनिल मोहन पवार, हर्षवर्धन दीपक खैरनार, अकील अहमद गुलाम दस्तगीर पटेल यांच्यासह इतर ५ ते ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
या सोबतच शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद श्यामराव तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन, विजय लक्ष्मण बांदल, पूनम रायसिंग राजपूत, जितेंद्र रामकृष्ण मुंदडा, रईस शेख रशीद शेख व जाकीर पठाण यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनी मते मिळवली. आता मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण भारताची अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असे यावेळी राष्टÑवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगितले.

-राज्यसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त होऊन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहचवणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती नायडू यांच्या वर्तवणुकीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.

Web Title: The NCP has tarnished the image of the Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.