'पुन्हा येईन'चा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी थेट बैठकीतच देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली

By मुकेश चव्हाण | Published: February 3, 2021 07:06 PM2021-02-03T19:06:35+5:302021-02-03T19:10:24+5:30

एकनाथ खडसे यांनी या बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

NCP leader Eknath Khadse has tount to former CM Devendra Fadnavis | 'पुन्हा येईन'चा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी थेट बैठकीतच देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली

'पुन्हा येईन'चा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी थेट बैठकीतच देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली

Next

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सध्या 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा' सुरू आहे. आगामी दिवसांत जयंत पाटील संवाद यात्रेसाठी जळगावमध्ये येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिीती लावली होती. 

एकनाथ खडसे यांनी या बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. आता राज्यातील राजकारण बदलत आहे. हे सरकार पडणार, असे विरोधकांना कितीही वाटत असेल तरी तसे होणार नाही. हे सरकार टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकारची 5 अशीच निघून जाणार आहेत, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 

तसेच भाजपाला 'पुन्हा येईन, पुन्हा येईन' असं म्हणत बसावं लागणार असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा येईन म्हणाणाऱ्यांच्या अहमपणामुळेच राज्यातील भाजपाचे सत्ता गेल्याचा, दावा देखील एकनाथ खडसे यांनी या बैठकीत केला आहे. 

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष असते. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा. टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

Web Title: NCP leader Eknath Khadse has tount to former CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.