भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 01:48 PM2022-07-31T13:48:55+5:302022-07-31T13:52:02+5:30

सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे.

ncp leader eknath Khadse will go to jail in Bhosari case is clear said bjp Girish Mahajan | भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

Next

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला हाेता. सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्याचं ते म्हणाले.

"दोन वर्षांपासून ज्या केसेस सुरू आहे, ईडीची जी चौकशी सुरू आहे, बोसरी प्रकरणात जे प्रकरणात त्यांनी जे पराक्रम केले आहेत, ते सर्वांच्या समोर आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून तुरूंगात आहेत. त्यांना न्यायालय अजूनही जामीन का देत नाही. त्यात अनियमतता आहे," असं महाजन म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.


"बोगस कंपनीकडून त्यांनी पैसे फिरवले, साडेतीन कोटी आपल्या अकाऊंटमध्ये आणले, अर्धे मंदाकिनी वहिनी, जावयांच्या नावावर जमिनी घेतल्या. ३० कोटींची जमीन ३ कोटी रूपये दाखवले. अधिकारी विनाकारण तुरुंगात गेला. यांनी मंत्री  असताना चुकीची कामं केली आहेत म्हणून ते ईडीच्या फेऱ्यात सापडलेत. सध्या न्यायालयाच्या नो कोर्स ऑफ अॅक्शनमुळेच ते तुरूंगात जात नाहीत. ते हटल्यानंतर यांनाही जावयासोबत जावं लागेल हे सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ आहे. हा आत टाकतोय तो टाकतोय याला अर्थ नाही. चौकशीला सामोरे जाऊन कागदपत्रं द्यावी," असंही ते म्हणाले.

Web Title: ncp leader eknath Khadse will go to jail in Bhosari case is clear said bjp Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.