विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:27 PM2019-09-05T13:27:16+5:302019-09-05T13:27:52+5:30

चाळीसगाव, जि. जळगाव : तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून कापूस, मका व ऊस हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीके ...

NCP marches on the Chalisgaon tahsil office | विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

Next

चाळीसगाव, जि. जळगाव : तालुक्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून कापूस, मका व ऊस हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीके आहेत. मागील वर्षी कपाशी ह्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच ह्या वर्षी मका ह्या पिकावर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यांसाठी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार अमोल गोरे यांना निवेदन देण्यात आले.
फळबाग, बोंडअळी,दुष्काळाची अनेक अनुदाने प्रलंबित असून शेतकरी बांधव सातत्याने तहसील कचेरीत चकरा मारत आहेत त्यातच संजय गांधी निराधार योजना उत्पनाचे दाखले यासह इतर कामांसाठी सर्वसामान्य नागरीक तहसिल कचेरीत फेºया मारत असतांना तहसील कार्यालयात अनेक महिला व शेतकरी बांधव विविध योजनांची कागदपत्रे घेऊन आढळली त्यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा कथन केल्यात.राजीव देशमुख यांनी तात्काळ प्रशासकीय अधिका?्यांना या गोष्टीचा जाब विचारला.जर सामान्य नागरिकांना वारंवार योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय व लोकप्रतिनिधींनी काढलेल्या विविध प्रकारच्या जत्रेत चकरा माराव्या लागत असतील तर प्रशासन यंत्रणेचा उपयोग काय असे राजीव देशमुख यांनी विचारले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.सदस्य अतुल देशमुख, पं.स.गटनेते अजय पाटील ,तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, अनिल जाधव, छगन पाटील, भैय्यासाहेब पाटील, अमोल चौधरी, मनोज भोसले, प्रकाश पाटील, शुभम् पवार, यज्ञेश बाविस्कर, राकेश राखुंडे, श्रीकांत राजपूत, पिनू सोनवणे, निखिल देशमुख, हृदय देशमुख, कौस्तुभ राजपूत, गोकुळ पाटील, दीपक शिंदे, गुंजन मोटे, आकाश पोळ, रवींद्र पाटील, रोहीदास वंजारी, शेषराव पाटील, ललित पवार, कैलास निकम, जालम चव्हाण, अशोक पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: NCP marches on the Chalisgaon tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव